Onion Prices : कांदा दरात 100 रुपयांनी तेजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 11:09 AM2020-03-03T11:09:53+5:302020-03-03T11:13:43+5:30
Onion Prices : बाजार समितीत 966 वाहनातील 13214 क्विंटल कांदा आवक झाली.
नाशिक - लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत मंगळवारी (3 मार्च) सकाळी कांदा लिलावाचे कामकाज सुरळीत सुरू झाले. बाजार समितीत 966 वाहनातील 13214 क्विंटल कांदा आवक झाली. किमान 650 ते कमाल 1665 रूपये सरासरी 1500 रूपये दर सकाळी जाहीर झाले. सोमवारच्या तुलनेत 100 रुपयांनी भाव वधारले.
सोमवारी (2 मार्च) बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर साधारणतः 1,157 वाहनातुन कांदा विक्रीस आला होता. नेहमीप्रमाणे कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर सदरचा कांदा कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त 1,652 रुपये व सर्वसाधारण 1,452 रुपये प्रती क्विंटल या दराने विक्री झाल्याने 266 वाहनांचा लिलावानंतर उपस्थित शेतकरी बांधवांनी कांदा लिलावाचे कामकाज बंद पाडले. जोपर्यंत संपुर्ण निर्यातबंदी उठविल्याची शासन अधिसुचना प्रसिद्ध करणार नाही. तोपर्यंत कांदा लिलावाचे कामकाज बंद राहील अशी भुमिका घेतल्याने उर्वरीत कांदा वाहनांचे लिलाव होऊ शकले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या
Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार
भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण