शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:03 PM2021-11-15T23:03:01+5:302021-11-15T23:04:35+5:30

नांदगाव : ४० व्या ज्युनियर गट राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलींचा संघ व पंजाबचा मुलांचा संघ अंतिम फेरीत विजयी झाला. विजेत्या संघांना आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.

Maharashtra girls team winner in shooting ball competition | शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा संघ विजेता

महाराष्ट्राच्या मुलींच्या विजेता संघाची कर्णधार स्नेहल रुपनर हिस पारितोषिक देताना अंजुम कांदे. समवेत नगराध्यक्ष राजेश कवडे, विष्णू निकम, अतुल निकम व संघातील खेळाडू.

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगावी सांगता : पंजाबचा मुलांचा संघ विजयी

नांदगाव : ४० व्या ज्युनियर गट राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलींचा संघ व पंजाबचा मुलांचा संघ अंतिम फेरीत विजयी झाला. विजेत्या संघांना आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना कांदे म्हणाल्या, सामन्यांच्या आयोजनामुळे नवीन पिढीत खेळाची आवड निर्माण होईल, खेळामुळे मन व तन दोघे सशक्त बनायला मदत होते. २२ राज्यांतील खेळाडूंनी नेत्रदीपक खेळ केला. येथील आयोजनाची आठवण घेऊन ते आपापल्या राज्यात जातील आणि शूटिंगबॉल या खेळाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर बनतील. खेळाचा दर्जा उंचावतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जिंकण्यासाठी एवढा सराव करा की जिंकलोच पाहिजे. जिंकल्यानंतर पुन्हा कोणी हरवलं नाही पाहिजे, असे प्रतिपादन छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम यांनी केले. शूटिंगबॉल फेडरेशनचे महासचिव रवींद्र तोमर यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
माजी सभापती सुमन निकम, तहसीलदार अमोल निकम (संगमनेर), संजय महाजन, आनंद कासलीवाल, राजीव दुसाने, ज्योती निकम, खजिनदार शकील काजी, भय्यासाहेब चव्हाण, विजय चव्हाण, निखिल रांगोळे, अतुल निकम, फेडरेशनचे पदाधिकारी शेकडो खेळाडू व हजारो शूटिंगबॉलप्रेमींच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा शानदार सोहळा संपन्न झाला.

 

Web Title: Maharashtra girls team winner in shooting ball competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.