महाराष्टÑ बंदला अनुचित वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:49 AM2018-08-10T00:49:02+5:302018-08-10T00:56:21+5:30

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय नाशिकच्या समितीने घेऊनही ऐनवेळी बेकी निर्माण होऊन त्याचा परिणाम शांतता बाधित होण्यावर झाला. एका गटाने डोंगरे मैदानावर शांततेत ठिय्या आंदोलन सुरू केले असताना, जमलेल्या जमावाने ‘शांतता नको, रस्त्यावर उतरा’ असा आग्रह धरल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. एका गटाने रस्त्यावर उतरून फेरी काढून बंदचे आवाहन केल्याने नागरिकांची पळापळ झाली.

Maharashtra: Inappropriate Loop of Bandala | महाराष्टÑ बंदला अनुचित वळण

महाराष्टÑ बंदला अनुचित वळण

Next
ठळक मुद्देकळवणला चक्का जाम; शिस्तबद्ध मोर्चा सटाणा, सिन्नर, मनमाडला ठिय्या

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय नाशिकच्या समितीने घेऊनही ऐनवेळी बेकी निर्माण होऊन त्याचा परिणाम शांतता बाधित होण्यावर झाला. एका गटाने डोंगरे मैदानावर शांततेत ठिय्या आंदोलन सुरू केले असताना, जमलेल्या जमावाने ‘शांतता नको, रस्त्यावर उतरा’ असा आग्रह धरल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. एका गटाने रस्त्यावर उतरून फेरी काढून बंदचे आवाहन केल्याने नागरिकांची पळापळ झाली.
शहरात मध्यरात्री ठक्कर बसस्थानकातील तीन शिवशाही बसेसच्या काचा फोडण्यात आल्याने महामंडळाने सेवा बंद केली. सिन्नर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून नाशिक-पुणे महामार्ग काही काळ आंदोलकांनी रोखून धरला. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, व्यापारी पेठा बंद झाल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्णात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, राज्य राखीव दलाची मदत घेण्यात आली आहे.
९ आॅगस्ट क्रांतिदिनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या स्थानिक समितीची बैठक होऊन नाशिकमध्ये बंद न पाळता डोंगरे मैदानावर सकाळ ते सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलन काळात शांतता पाळण्याचे ठरविण्यात आले. समितीच्या या निर्णयाला सर्वानुमते सहमती दर्शविण्यात आली असली तरी, या बंदबाबत सोशल माध्यमातून उलटसुलट संदेश प्रसारित करण्यात आल्याने शहर व परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.  त्यातच सरकारी कर्मचाऱ्यांचा तीनदिवसीय संप सुरू असल्याने व त्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाल्याने शासकीय कार्यालये, शाळा बंद असल्यामुळे गुरुवारी सकाळपासून शहरवासीयांच्या मनात धाकधूक होती.
बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल
बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्री ठक्कर बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाहीच्या तीन बसेसवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडल्याने एस.टी. महामंडळाने संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बाहेरगावी जाणाºया लांब पल्ल्याच्या एस.टी. बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे ठिकठिकाणाहून येणाºया बंदच्या वृत्ताने शहर बससेवाही पहाटेपासून बंद करण्यात आली. जुने बसस्थानक, ठक्कर बसस्थानक, महामार्ग बसस्थानक येथे सर्व बस उभ्या करून ठेवण्यात आल्या. सर्व प्रकारची बससेवा बंद करण्यात आल्याने बाहेरगावच्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्याचप्रमाणे शहरातील नोकरदार, कामगार वर्गालाही वेळेत नोकरी, धंद्यावर पोहोचणे मुश्किल झाले.
शाळा, महाविद्यालये बंद
या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांच्या बंदबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला होता. बुधवारी यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या नावाने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याचे संदेश सोशल माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याने संभ्रमात मोठी भर पडली होती. तथापि, या बंदच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी बुधवारीच आगावू सुटी जाहीर केली होती. तर महापालिकेच्या शाळांना आदिवासी दिनानिमित्त सुटी जाहीर करण्यात आली होती. शहरातील अन्य खासगी शाळा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविल्याने शाळा ओस पडल्या होत्या, तशीच परिस्थिती शहरातील महाविद्यालयांची झाली.
शहरात अघोषित बंद
शहरात बंद न पाळण्याचे अगोदर जाहीर केलेले असल्यामुळे निर्धास्त असलेल्या शहरवासीयांना दुपारी बारा वाजेनंतर अघोषित बंदला सामोरे जावे लागले. डोंगरे मैदानावर मराठा समितीत बेकी निर्माण झाल्यामुळे ठिय्या आंदोलनासाठी जमलेल्या हजारो तरुणांनी थेट गंगापूर रस्त्यावर धाव घेत अशोकस्तंभ, मेहेर चौक, महात्मा गांधी रोड, मेनरोड, शिवाजीरोड, जुना त्र्यंबक नाका, जिल्हा रुग्णालय, टिळक पथ, शरणपूररोड, कॅनडा कॉर्नर या मार्गावरून फेरी काढून दुकानदारांना बंदचे आवाहन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. या फेरीमुळे क्षणार्धात दुकाने, बाजारपेठ बंद करण्यासाठी दुकानदारांची धावपळ उडाली. डोंगरे मैदानावर जमलेल्या दुसºया गटाने कॉलेजरोड, गंगापूररोड, महात्मानगर या भागातूनही बंदचे आवाहन करण्यास सुरुवात केल्याने शहर व परिसरात दुपारी दीड वाजेनंतर अघोषित बंदला सुरुवात झाली. या बंदमुळे कोट्यवधीची आर्थिक उलाढाल ठप्प झाली.
दृष्टिक्षेपात नाशिक जिल्हा
* चांदवड येथे चौक रस्ता येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
* कळवण येथे मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जनजीवन पूर्ववत.
* सटाणा येथे मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
* मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील टेहेरे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
* सिन्नर येथे तहसील कार्यालयासमोर मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
* येवला येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढून प्रांत अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. माझ्यावर हल्ला झाला नाही : माणिकराव कोकाटे
नाशिक : डोंगरे वसतिगृह मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित ठिय्या आंदोलनात सकाळी दहा-पंधरा अनोळखी तरुणांचे टोळके व्यासपीठावर गोंधळ घालत होते़ त्यांची अर्वाच्च भाषा, भावना भडकावणारे भाषणे तसेच विरोधातील वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती.त्यांना समजावूनही ते ऐकत नसल्याने अखेर माईक हिसकावून घेतला़ यावेळी माझ्यावर कोणताही हल्ला झालेला नाही. आंदोलनातून मला बाहेर काढण्यात आलेले नाही़ त्यामुळे यापुढे जातीचा दाखला असणाºयांनाच समााजाच्या व्यासपीठावर प्रवेश देण्यात यावा, असे सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
जिल्ह्णातील सर्वपक्षीय नेत्यांनी ठिय्या आंदोलन शांततेत करण्याचा निर्णय घेतलेला होता़ डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनात गोंधळ घालीत समाजास बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांना थांबविण्यासाठी दोन वेळा गेलो़ मात्र ते ऐकत नसल्याने माईक हिसकावून घेतल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला़ यानंतर काही नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या़ त्यामुळे गाड्या फोडणारे हे तरुण नक्कीच मराठा समाजाचे कार्यकर्ते नव्हते तर बाहेरील तरुणांकडून आंदोलनास हिंसक वळण देण्याचाच हा प्रयत्न असल्याचे आपले मत असल्याचे कोकाटे यांनी सांगितले़
मी आंदोलनाच्या व्यासपीठावर उपस्थित राहिलो यास लोकांचा विरोध होता, असे नाही़ तसेच माझ्यावर हल्ला झालेला नाही कारण यापूर्वी दोन तास मी व्यासपीठावरच होतो त्यावेळी मात्र काही झाले नाही़ कोणत्याही समाजाविरोधात भाषणे वा शिवीगाळ न करता विधायक मार्गाने आंदोलन करावे, असा सर्वांचाच निर्णय होता़ यापुढील समाजाच्या आंदोलनात जातीचा दाखला असल्याशिवाय व्यासपीठावर प्रवेश दिला जाणार नाही़ मुळात या आंदोलनाला नेता व चेहरा नसल्यानेच ही अवस्था झाली़ आंदोलनासाठी सामुदायिक नेतृत्व पुढे केले मात्र तेही समाजकंटकांना मान्य झाले नसल्याचेकोकाटे यांनी सांगितले़ यावेळी शिवसेनेचे विजय करंजकर, राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे, शिवसेनेचे अजय बोरस्ते, भाजपाचे सुनील बागुल, तुषार जगताप, योगीता आहेर आदी उपस्थित होते़ दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

Web Title: Maharashtra: Inappropriate Loop of Bandala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.