महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा आई-वडीलांसह शेनीत येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 06:08 PM2020-01-21T18:08:42+5:302020-01-21T18:15:09+5:30
सर्वितर्थ टाकेद : महाराष्ट्र केसरी पहिलवान हर्षवर्धन सदगीर व त्याच्या आई वडिलांचा शेनीत या गावी जय बजरंग बली तालीम संघ ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
सर्वितर्थ टाकेद : महाराष्ट्र केसरी पहिलवान हर्षवर्धन सदगीर व त्याच्या आई वडिलांचा शेनीत या गावी जय बजरंग बली तालीम संघ ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
समारंभाला आमदार माणिक कोकाटे, नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, बलकवडे व्यायाम शाळेचे संचालक विशाल बलकवडे, महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांची आई ठकूबाई सदगीर, वडील मुकेश सदगीर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रतन पाटील जाधव, पहिलवान रमेश कुकडे, राष्ट्रवादी इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, प्रताप ढोकणे, बाळू जाधव, विजय जाधव, सरपंच वैशाली जाधव, सचिन जाधव, शिवसंग्रामचे जिल्हा कार्याध्यक्ष महेश गाढवे, राम शिंदे, जि. प. सदस्य उदय जाधव, वाडीवºहे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप वाजे, नामदेव वाकचौरे, मनोज सहाणे, कचरू कडभाने, भाऊसाहेब कडभाने, अशोक जाधव, तानाजी जाधव आदींसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
शणीत ग्रामस्थांनी महिलांनी त्याचे औक्षण करून सर्व मान्यवरांना फेटा बांधत फटाक्यांची आतषबाजी करत, सजवलेल्या बैलगाडी रथावर विराजमान करून डी जे च्या आवाजावर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत स्वागत केले होते. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी गोरखनाथ बलकवडे, आमदार माणिक कोकाटे, विशाल बलकवडे आदींची भाषणे झाली.
याच गावातून माझा हर्षवर्धन कुस्त्यांचे धडे गिरवायला लागला शेणीत ग्रामस्थांमुळेच भगूर येथील गोरखनाथ बलकवडे यांचे हर्षवर्धनला सहकार्य व मार्गदर्शन लाभले व तो त्यांच्या तालमीच्या आखाड्यात शिकला असे हर्षवर्धनच्या आईने आपल्या मनोगतातून शेणीत ग्रामस्थांचे आभार मानले.
माझ्या कुस्ती क्षेत्रातील पहिल्यांदा सुरुवात ही या आपल्या शेणीत गावातूनच झाली आहे. तुमच्या सदिच्छा आणि आशिर्वाद यामुळेच आज मी महाराष्ट्र केसरी हा किताब बहुमान संपादन करू शकलो. असे महाराष्ट्र केसरी पहिलवान हर्षवर्धन सदगीर याने सत्काराला उत्तर देताना सांगितले.
कार्यक्र माचे आयोजन विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जय बजरंगबली ग्रुप, रॉयल ग्रुप व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ यांनी केले होते. सूत्रसंचालन तानाजी जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सचिन जाधव यांनी केले.
याप्रसंगी सरपंच वैशाली जाधव, उपसरपंच मनीषा वारुंगसे, शरद तेलोरे, राजू जाधव, सरला घारे, रवी पवार, संगीता जाधव, मंदा जाधव, विजय जाधव, कुंडलिक तेलोरे, गणेश जाधव, मनोज हगवणे, बाळासाहेब जाधव आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ े उपस्थित होते.