बैलगाडीत बसून शांतिगीरी महाराज आले आणि शिवसेनेकडून भरला उमेदवारी अर्ज
By संजय पाठक | Published: April 29, 2024 02:42 PM2024-04-29T14:42:56+5:302024-04-29T14:44:33+5:30
Maharashtra lok sabha election 2024 : महायुतीत उमेदवारीचा घेाळ असताना शांतिगीरी महाराज यांनी शिवसेना असा पक्ष लिहून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली.
नाशिक - जय बाबाजी भक्त परीवाराचे प्रमुख परमपुज्य शांतिगीरी महाराज यांनी आज शेकडो भक्तगणांसह शक्तीप्रदर्शन केले. पंचवटीतून निघालेल्या या शोभायात्रेत ते बैलगाडीत बसून सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महायुतीत उमेदवारीचा घेाळ असताना शांतिगीरी महाराज यांनी शिवसेना असा पक्ष लिहून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली.
३ मे पर्यंत त्यांना ए बी फार्म सादर करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या शुक्रवारी शांतिगीरी महाराज यांनी अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि काल रात्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. आज भक्तगणांसह शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल करण्याचा मनोदय व्यक्त केला हेाता.त्यानुसार बैलगाडीत बसून ते शोधा यात्रेत सहभागी झाले आणि नंतर उमेदवारी अर्ज दाखल केला.