Nashik: मतदान फुल करा, नाशिक कुल करा! नाशिकमधील पर्यावरणप्रेमींचा अनोखा जाहिरनामा
By संजय पाठक | Published: May 11, 2024 02:45 PM2024-05-11T14:45:36+5:302024-05-11T14:46:44+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक म्हंटली की, राजकीय पक्ष आणि उमेदवार आपला जाहिरनामा तयार करतात. मात्र, नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी अनाेखा पर्यावरण जाहिरनामा तयार केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत त्याचा प्रचार सुरू करण्यात आला असून निवडणूकीतील उमेदवारांना तो सादर केला आहे.
-संजय पाठक
नाशिक - लोकसभा निवडणूक म्हंटली की, राजकीय पक्ष आणि उमेदवार आपला जाहिरनामा तयार करतात. मात्र, नाशिकमधीलपर्यावरण प्रेमींनी अनाेखा पर्यावरण जाहिरनामा तयार केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत त्याचा प्रचार सुरू करण्यात आला असून निवडणूकीतील उमेदवारांना तो सादर केला आहे.
मतदान करा फुल, नाशिक करा कुल असे ब्रिद प्रचारासाठी ठेवण्यात आले असून त्या निमित्ताने मतदानासंदर्भात जागृती देखील केली जात आहे. कधी काळी थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आता तापमान चाळीशी पार जात असून कमाल तापमानाचे उच्चांक प्रस्थापित केले जातात. त्या पाश्व'भूमीवर नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी हा जाहिरनामा केला आहे. यात नदीच्या संवर्धनासाठी पूररेषेत कोणतीही बांधकामे होऊ देऊ नयेत, डोंगरांवर वृक्षारोपण करावे, प्रादेशिक गौवंश जगवून प्रदूषण मुक्त, विषमुक्त शाश्वत ग्रामविकासासाठी प्रयत्न करावेत, शिवकालीन गड किल्ले आणि डोंगर यांचे संवर्धन करावेत अशा प्रकारच्या मागण्या जाहिरनाम्यात आहेत. नाशिक लोकसभा
मतदार संघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना आज हा जाहिरनामा देण्यात आला. यावेळी निशिकांत पगारे , मनीष बाविस्कर , योगेश बर्वे , सुनिल परदेशी आदी उपस्थित होते.