महाराष्ट्र मल्लखांबच्या बैठकीत नाशिकच्या संघटनेस मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:13+5:302020-12-14T04:30:13+5:30

नाशिक : महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेची कार्यकारिणीची बैठक नाशिकच्या यशवंत व्यायामशाळेत नुकतीच पार पडली. या बैठकीत नाशिक जिल्हा मल्लखांब ...

Maharashtra Mallakhamba meeting approves Nashik's organization | महाराष्ट्र मल्लखांबच्या बैठकीत नाशिकच्या संघटनेस मान्यता

महाराष्ट्र मल्लखांबच्या बैठकीत नाशिकच्या संघटनेस मान्यता

Next

नाशिक : महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेची कार्यकारिणीची बैठक नाशिकच्या यशवंत व्यायामशाळेत नुकतीच पार पडली. या बैठकीत नाशिक जिल्हा मल्लखांब संघटनेला मान्यतेसह संलग्नता देण्याचा निर्णय झाला.

महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेची कार्यकारिणीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र अधिकारी, उपाध्यक्ष डॉ.सुभाष डोंगरे, कार्याध्यक्ष उत्तम लटपटे, कार्यउपाध्यक्ष दलाल, ॲड.महादेव झुंझे पाटील, सचिव श्रेयस म्हसकर, सहसचिव पांडुरंग वाघमारे, विश्वतेज मोहिते, कोषाध्यक्ष बापू समलेवाले, ॲड.संजय केकाण, बालाजी नलवडे, अनिल नागपुरे, यशवंत जाधव, शांताराम जोशी, नीता ताटके, सचिन परदेशी असे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. छत्रपती पुरस्कार विजेते कार्यकारिणीचे माजी सहसचिव दत्ताराम दुदम यांना श्रद्धांजली वाहून बैठकीस सुरुवात करण्यात आली. मल्लखांबाच्या विकास व प्रगतीसाठी काही ठोस निर्णय घेण्यात आले. या बैठकीत सर्वानुमते नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशन, नाशिक या असोसिएशनला संलग्नता देण्यात आली. नाशिक जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष विनायक पाठक, सचिव रमेश वझे, सहसचिव यशवंत जाधव, खजिनदार दत्तात्रय शिरसाठ,सत्यप्रिय शुक्ल या सर्वांनी कार्यकारिणीच्या सभासदांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दत्तात्रय शिरसाठ यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Maharashtra Mallakhamba meeting approves Nashik's organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.