महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिनी उत्पादनांच्या जाहीरांतींविरोधात आक्रमक भूमिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:32 PM2020-06-25T16:32:08+5:302020-06-25T16:40:23+5:30

भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत अलून शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहीराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी केली आहे. 

Maharashtra Navnirman Sena's aggressive stance against advertisements of Chinese products | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिनी उत्पादनांच्या जाहीरांतींविरोधात आक्रमक भूमिका 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिनी उत्पादनांच्या जाहीरांतींविरोधात आक्रमक भूमिका 

Next
ठळक मुद्देचिनी उत्पादनांविरोधात मनसेची आक्रमक भूमिका शहरातील चीन उत्पादनांच्या जाहीराती तत्काळ हटवा मनसेचे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन

नाशिक : भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत अलून शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहीराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे. 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर आदी नेत्यांच्या सुचनांप्रमाणे मनसेच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे साहेब याची भेट घेऊन नाशिक शहरातील चीनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्यात याव्यात यासाठी निवेदेन सादर केले. चीनी सैनिकांनी भारत-चीन नियंत्रण रेषेवरील लद्दाखच्या गोलवन खोºयातील भारतीय भूभागावर निशस्त्र भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला केल्याने या हल्ल्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. चीनच्या या आगळीकीने देश व राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोषाची भावना आहे. चीनच्या या मुजोर आगळीकीला आर्थिक निबंर्धाने प्रतिऊत्तर देण्याची मागणी जनतेच्या सर्व थरांतून होत आहे.  मात्र शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी व प्रमुख बाजारपेठांमधील व्यावसायिक आस्थापनांवर चीनी वस्तूंच्या जाहिराती व फलकांमुळे जनमानसात मोठ्या प्रमाणावर रोष असल्याचे नमूद करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील असे जाहिराती व फलक संबंधितांनी त्वरीत काढून घ्याव्यात अशी मागणी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनांच्या माध्यमातून केली आहे. त्याचप्रमाणे संबधितांनी असे जाहीराती व फलक काढले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चीनी उत्पादनांच्या जाहिराती व फलकांवर काळे फासण्याचे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रतिनिधी मंडळाने केली दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनपा आयुक्तांना  निवेदनावर देताना मनविसेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. 

Web Title: Maharashtra Navnirman Sena's aggressive stance against advertisements of Chinese products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.