महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक जिल्हा कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 05:07 PM2020-10-08T17:07:08+5:302020-10-08T17:08:36+5:30
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक विभाग व नाशिक जिल्हा शाखेची सर्वसाधरण सभा मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात उत्साहात संपन्न झाली.
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक विभाग व नाशिक जिल्हा शाखेची सर्वसाधरण सभा मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात उत्साहात संपन्न झाली.
सभेत जिल्हा कार्यकारणीं निवड व विभागीय कार्यकारणी निवड करण्यात आली. विभागीय कार्यकारणी राज्य संघटन सचिव एकनाथ मोरे यांनी जाहीर केली. विभागीय अध्यक्ष नानासाहेब पटाईत, सचिव अरविंद जगताप, कार्याध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष उदय लोखंडे, उत्तम गांगुर्डे, जेष्ठउपाध्यक्ष शांताराम साळवे यांची निवड एकमताने करण्यात आली.
नाशिक जिल्हा कार्यकारणी विभागीय अध्यक्ष गोविंद कटारे यांनी जाहीर केली. यात जिल्हाध्यक्ष निलेश पाटोळे, सरचिटणीस रत्नाकर अहिरे, कार्याध्यक्ष भगवान बच्छाव, कोषाध्यक्ष जितेंद्र राठोड, उपाध्यक्ष कैलास शिंदे, एस.के.गांगोडे, संगीता सोनवणे, पंडित कटारे, सहसचिव भगवान पगारे, सिद्धार्थ मोरे, बाळासाहेब शिराळ, अनिता दाणी, जेष्ठ उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, जिल्हा मुख्य संघटक राज आहेर, संघटक सुभाष लोहकरे, मोहन यशवंते, कैलास सांगळे, प्रसिद्धी प्रमुख आर. के. गांगुर्डे, राजू अहिरे तर लेखापरीक्षक भाऊसाहेब सोनवणे, कार्यकारिणी सभासद राजू जाधव, सुनील जाधव, राजेंद्र बागुल, आशा खरात, राजेंद्र मोहिते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी बापू सादवे, राहुल सोनवणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.