महाराष्ट्र राज्य धोबी-परीट समाज महासंघाचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:43 PM2018-11-21T17:43:23+5:302018-11-21T17:43:35+5:30
सटाणा :शहरात बागलाण, कळवण आणि देवळा या तालुक्यातील धोबी-परीट सर्व भाषिक समाज बांधवांचा मेळावा जयराम वाघ यांच्या अध्यक्ष्यतेखाली संपन्न झाला .
सटाणा :शहरात बागलाण, कळवण आणि देवळा या तालुक्यातील धोबी-परीट सर्व भाषिक समाज बांधवांचा मेळावा जयराम वाघ यांच्या अध्यक्ष्यतेखाली संपन्न झाला .
या वेळी महाराष्ट्र प्रदेश कला-क्र ीडा अध्यक्ष मनोज म्हस्के, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे सुरेश शिरोडे, एम.एस. ई. बी.चे सुशांत मोतीकर, अमर जमधडे, गणेश वराडे, सी. आर. परदेशी, राजाभाऊ बोरसे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.
यावेळी या तीनही ताल्युक्यातील समाज बांधव व महिला मोठया संख्येने उपस्तीत होत्या. यावेळी मनोज म्हस्के यांनी विजबीलाच्या दाराबद्दल माहिती दिली, अमर जमदाडे, सुरेश शिरोडे व सुशांत मोतीकर यांनीही मार्गदर्शन केले.
जिल्हा कार्यकारी सद्स्य शिवाजी शिंदे, विजय परदेशी या नवीन नियुक्त झालेल्यांना नियुक्तीचे पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बागलाण तालुका अध्यक्ष सुरेश मोगरे, उपाध्यक्ष - बाळासाहेब शिंदे, शहर अध्यक्ष - प्रकाश मोगरे, कार्याध्यक्ष - अनिल मोगरे, तसेच सतीश खैरनार, नंदू परदेशी, भरत परदेशी, सुनील अंतुरेकर , अशोक मोगरे, आदिंचा समावेश आहे. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन राजेश परदेशी यांनी केले.
फोटो कॅप्शन; सटाणा येथे आयोजित महाराष्ट्र धोबी- परीट समाज महासंघाचा मेळावा कार्यक्र मात दीप प्रज्वलन करतांना जयराम वाघ, सोबत मनोज म्हस्के, सी. आर. परदेशी, सुरेश शिरोडे, राजाभाऊ बोरसे, गणेश बोराडे आदी.