Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 12:47 PM2024-11-20T12:47:29+5:302024-11-20T12:48:27+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्या दोन्ही गटात जोरदार वादावादी झाल्याचे समोर आले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 There was an argument between Suhas Kande and Sameer Bhujbal | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. काही ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया होत आहे, तर काही ठिकाणी गोंधळ झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. नांदगाव विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे, अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे.  सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना भुजबळ यांनी अडवले. यावळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

आज मतदानासाठी शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी काही लोकांना बोलावले होते. यावेळी त्या लोकांच्या गाड्या समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या.  यावेळी सुहास कांदे तिथे आले यावेळी समीर भुजबळही तिथे उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  'आज तुझा मर्डर फिक्स आहे', असं सुहास कांदे समीर भुजबळांना सांगत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 

यावेळी काहीवेळ मोठा गोंधल उडाला होता. पोलिसांनी मोठा बंदोबस्त मागवून या ठिकाणी झालेली गर्दी पांगवली. सुरुवातील सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी एक बस भरुन मतदारांना आणले होते. यावेळी ही बस समीर भुजबळ यांनी अडवली. यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. मोठा गोंधळ निर्माण झाला. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. या ठिकाणावरुन कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे सुहास कांदे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढत आहेत. 


Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 There was an argument between Suhas Kande and Sameer Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.