महाराष्टची लोकधाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:33 AM2019-11-02T01:33:36+5:302019-11-02T01:33:55+5:30
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, अंबड यांच्यातर्फे आयोजित महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कलांचे सादरीकरण केले.
नाशिक : ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, अंबड यांच्यातर्फे आयोजित महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कलांचे सादरीकरण केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी उपस्थित होते. यावेळी जोशी म्हणाले की, विद्या आणि कलेमध्ये फार मोठा फरक आहे. विद्या ही शिकावी लागते तर कला ही आत्मसाथ लागते. विद्या जगाचे कोडे सोडविते तर कला ही जगाला घडविते, हा फरक ज्यांच्या लक्षात येईल तेव्हा जगण्याचा खरा आनंद लक्षात येईल, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला. दैनंदिन शैक्षणिक अभ्यास- क्रमासह विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागावे, मनाची एकाग्रता वाढावी आणि भविष्यात त्यांच्या पायावर उभे राहता यावे म्हणून क्र ीडा, संगीत, गायन, नृत्य, नाट्य, चित्रकला अकादमीचा अभ्यासक्रम ग्लोबल व्हिजन स्कूलतर्फे राबवित असतो.
या कार्यक्र मास पालक आणि विद्यार्थीवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात शाळेच्या संचालक विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी ग्लोबल व्हिजन स्कूलमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबत उपस्थितांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान संपादन करू नये तर भविष्यात आपल्या आवडीचे विषय आणि छंद यांना चालना मिळावी म्हणून प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी पालकांना केले. शैक्षणिक अभ्यास- क्रमासोबत कला व छंद वर्गात विद्यार्थ्यांनी घेतलेले कलेचे शिक्षण पालकांसमोर सादर करण्याच्या उद्देशाने ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल अंबड यांच्यातर्फे ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात जागर गीत, कोळी गीत, ठाकर गीत, भारुड गीत, जागरण-गोंधळ, मैदानी खेळ, वारकरी, लावणी, दोरीवरील मल्लखांब, तबलावादन, हार्मोनियमवादन, गिटारवादन, असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले होते.
हेमा जोशी, चैताली दासमोहपात्रा, सचिव शशांक मणेरीकर, सर्व विभागांचे समन्वयक व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन कला शिक्षक रोहित पगारे यांनी केले. अनुष्का बोटेकर यांनी आभार मानले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
ग्लोबल व्हिजन ग्रुप आॅफ स्कूल्सतर्फे क्र ीडा, संगीत, गायन, नृत्य, नाट्य, चित्रकला अशा विविध कला शिक्षकांतर्फे त्यांना चांगले शिक्षण दिले जाते. ज्यामध्ये शाळेतील काही विद्यार्थी तबलावादन, हार्मोनियमवादन, गिटारवादन, गायन, विविध क्र ीडा प्रकारात तर काही विद्यार्थी नाट्य आणि चित्रकला शिकत आहेत.
४शाळेतर्फे प्रत्येक विषयवार अकादमी सुरू करून त्यांना त्यामार्फत प्रत्यक्षपणे शिक्षण दिले जात आहे. विविध अकादमीच्या माध्यमातून शिकत असलेली कला पालकांना दाखविता यावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.