...यंदा महासभा महाकवी कालीदास कलामंदिरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:43 PM2020-05-14T18:43:54+5:302020-05-14T18:44:24+5:30
महापालिकेच्या इतिहासात नाट्यगृहात सभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज कसे चालते या विषयी उत्सुकता आहे.
नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळळ्यासाठी महापालिकेतील सर्व बैठका रद्द असल्या तरी आता लोकप्रतिनिधीच्या हट्टाखातर यंदा महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने हिरवा कंदिल दिल्याने यंदा महासभा येत्या २० मे रोजी महाकवी कालीदास कलामंदिरात होणार आहे. अर्थात, त्यावर नव्यापेक्षा जूनेच विषय अधिक आहेत. पाणी करार, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणे यासारख्या जुन्याच वादग्रस्त विषयांना त्यामुळे उजाळा मिळण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीचे संकट देशावर घोंगावु लागताच मार्च महिन्यात शासनाने सर्व प्रकारच्या शासकिय बैठका आणि अन्य कामकाज स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी देखील मार्च महिन्याची सभा रद्द केली त्यानंतर एप्रिल मध्ये तर आणखीनच भयंकर स्थिती देशभरात निर्माण झाल्याने पुन्हा ही सभा तहकुब करण्यात आली. मात्र आताही सभा घेण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रयत्न सुरू केले. महापालिकेच्या सभागृहात १२६ नगरसेवक तसेच अधिकारी सुमारे पावणे दोनशे जण बसतात. नगरसेवकांचे
कार्यकर्ते प्रेक्षागृहात असतात. मात्र, सध्या फिजीकल डिस्टसिंग पाळायचे असल्याने त्या दृष्टीने महापौर सतीश कुलकर्णी यांनी महाकवी कालीदास कलामंदिराची जागा निवडली आहे. सुमारे एक हजार आसन व्यवस्था असलेल्या या नाट्यगृहात फिजीकल डिस्टसिंग पाळून नगरसेवक आणि अधिकारी बसू शकतात,
त्यामुळे ही जागा निवडण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात नाट्यगृहात सभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे
त्यामुळे सभागृहाचे कामकाज कसे चालते या विषयी उत्सुकता आहे. दरम्यान, अशाप्रकारची सभा घेण्याच्या विषयात नाविन्य मात्र नाही. अंदाजपत्रक मंजुरीच्या घाईसाठी महासभा घेण्याचा आग्रह असल्याचे सांगितले जात असले
तरी प्रत्यक्षात मात्र प्रलंबीत जलकरार, सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करणे, सिंहस्थातील कामांचे ज्यादा रकमेची देयके देणे अशा प्रकारचे जूनेच विषय आहेत. त्यात केवळ महापालिकेने भूसंपादनासाठी प्राधान्य क्रम ठरविणे
हा विषय केवळ नवीन आहे.