महाशिवरात्र : चांदवड, मनमाड, मालेगाव येथे धार्मिक कार्यक्रम; कीर्तन, प्रवचनासह ठिकठिकाणी फराळाचे वाटप जिल्ह्यातील महादेव मंदिरांत भाविकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:26 PM2018-02-13T23:26:01+5:302018-02-13T23:51:57+5:30

नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर फराळाचे वाटप केले.

Mahashivaratri: Religious programs at Chandwad, Manmad, Malegaon; Distribution of Fraternity along with Kirtan, Sermon, Rath in the Mahadev Temple of the District | महाशिवरात्र : चांदवड, मनमाड, मालेगाव येथे धार्मिक कार्यक्रम; कीर्तन, प्रवचनासह ठिकठिकाणी फराळाचे वाटप जिल्ह्यातील महादेव मंदिरांत भाविकांच्या रांगा

महाशिवरात्र : चांदवड, मनमाड, मालेगाव येथे धार्मिक कार्यक्रम; कीर्तन, प्रवचनासह ठिकठिकाणी फराळाचे वाटप जिल्ह्यातील महादेव मंदिरांत भाविकांच्या रांगा

googlenewsNext
ठळक मुद्देभाविकांचे श्रद्धास्थान जागृत देवस्थानमंदिर परिसरात विद्युत रोषणाई

नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर फराळाचे वाटप केले. चांदवड, मनमाड, जोरण, मालेगाव आदी ठिकाणी शिवरात्रीनिमित्त यात्रांना प्रारंभ झाला आहे.
जोरण बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील, सटाण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कपालेश्वर देवस्थान येथे फेब्रुवारी महिन्यात यात्रा भरवली जाते. कसमादे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाणारे हे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी परिसरातील हजारो भाविक यात्रेसाठी व दर्शनासाठी हजेरी लावतात. अनेक वर्षांपासून यात्रेची ही अखंड परंपरा चालू आहे. पहाटे काकडा आरती व पोपट नाना महाराज यांच्या हस्ते पिंडीला अभिषेक केला जातो. यानिमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. निसर्गरम्य वातावरण व मंदिराच्या बाजूस असलेला केवडीचा बन प्रसिद्ध आहे. यात्रानिमित्ताने निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. तसेच रात्री कपालेश्वर देवस्थानचे मठाधिपती पोपट नाना महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होतो.
देवळा तालक्यात विविध कार्यक्रम
देवळा : तालुक्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर, गुंजाळनगर, देवदरा, माळवाडी आदी ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहभर भजन, कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र रामेश्वर येथे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत पुरातन अशा सहस्रलिंग देवस्थान येथे स्व. वै. गुरुवर्य वामनानंद महाराज यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांचे कार्यक्र म आयोजित करण्यात आले. माळवाडी, तसेच पिंपळगाव (वा.) येथील पुरातन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. तसेच गुंजाळनगर येथील श्रीक्षेत्र नांदुरेश्वर येथे रुद्राभिषेक, होमहवन, भजन, हरिपाठ, जाहीर कीर्तन, महाप्रसाद आदींचा लाभ भाविकांनी घेतला. महाशिवरात्रीनिमित्ताने भाविकांना खजूर, साबुदाणा खिचडी आदी उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. भाविकांनी महादेव मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती.
मनमाड येथे विविध कार्यक्रम
मनमाड : शहर व परिसरात महाशिवरात्रीनिमित्त विविध महादेव मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. शहरातील पुरातन संगमेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, तर नागापूर येथील पुरातन नागेश्वर मंदिरात यात्रेनिमित्त दर्शनासाठी तालुक्यातून भाविक आले होते.

Web Title: Mahashivaratri: Religious programs at Chandwad, Manmad, Malegaon; Distribution of Fraternity along with Kirtan, Sermon, Rath in the Mahadev Temple of the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.