उमराणे येथे महाशिवरात्र यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:21 PM2019-03-02T22:21:48+5:302019-03-02T22:23:05+5:30
उमराणे : पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.४) सुरुवात होत असून, चार दिवस भरणाऱ्या या यात्रोत्सव काळात पारंपरिक व मनोरंजनात्मक कार्यक्र मांचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
उमराणे : पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून
(दि.४) सुरुवात होत असून, चार दिवस भरणाऱ्या या यात्रोत्सव काळात पारंपरिक व मनोरंजनात्मक कार्यक्र मांचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने
करण्यात आले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या उमराणे गावात महाशिवरात्रीला दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने मोठी यात्रा भरते.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला यात्रोत्सव आजही अखंडितपणे सुरू असून, यापूर्वी तीन दिवसांची यात्रा
भरत होती; परंतु यात्रेचे वाढते स्वरूप पाहता गेल्या काही वर्षांपासून एका दिवसाच्या यात्रेत वाढ झाली आहे.
या यात्रोत्सव काळात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फेकला, सांस्कृतिक हा स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे महारु द्राभिषेक होऊन यात्रेस प्रारंभ होणार आहे.
मंगळवारी प्रथेनुसार दुपारी दोन वाजता सुरेश भगत यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्यात येणार आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजता कुस्तीशौकिनांसाठी कुस्त्यांची दंगल होणार असून, कुस्ती दंगलीसाठी जिल्ह्यातील नामांकित मल्ल हजेरी लावतात. जिंकलेल्या मल्लवीरांना रोख स्वरूपात बक्षिसे देऊन गौरविण्यात येते.