महाश्रमदान सप्ताहाचा सुरू झाला झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 12:26 AM2022-02-08T00:26:48+5:302022-02-08T00:27:45+5:30

ओझरटाऊनशिप : आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देव-देश-धर्मासाठी सोमवार, दिनांक ७ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पहिल्या महाश्रमदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्त परिवाराच्या वतीने तब्बल सव्वा कोटी तास महाश्रमदान होणार असून, त्याअंतर्गत वर्षभर अनेक श्रमदान सप्ताहास सुरुवात करण्यात आली. पहिला सप्ताह भक्त परिवाराच्या राज्यभर असलेल्या विविध आश्रमात होत आहे.

Mahashramdan week started in a storm | महाश्रमदान सप्ताहाचा सुरू झाला झंझावात

महाश्रमदान सप्ताहाचा सुरू झाला झंझावात

googlenewsNext
ठळक मुद्देश्रमप्रतिष्ठा वाढविण्यासाठी सरसावला जय बाबाजी भक्त परिवार

ओझरटाऊनशिप : आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देव-देश-धर्मासाठी सोमवार, दिनांक ७ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पहिल्या महाश्रमदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्त परिवाराच्या वतीने तब्बल सव्वा कोटी तास महाश्रमदान होणार असून, त्याअंतर्गत वर्षभर अनेक श्रमदान सप्ताहास सुरुवात करण्यात आली. पहिला सप्ताह भक्त परिवाराच्या राज्यभर असलेल्या विविध आश्रमात होत आहे.

कठोर तपस्वी, निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांनी पन्नास वर्षांपूर्वी श्रमदानाच्या या दिव्य परंपरेची सुरुवात केली. त्याकाळी आपल्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भविकाला जगद्गुरू बाबाजींनी श्रमदानाचे महत्त्व सांगून कृतीतून श्रमदान करण्यास सांगितले आहे.
कामातच ह्यरामह्ण आहे. ह्यजो करेल श्रमदान त्याला घडेल चारीधामह्ण असे भाविकांना सांगून त्यांनी खऱ्या अर्थाने श्रमप्रतिष्ठा वाढविण्याचे महत्कार्य त्यांनी केले. त्यांची हीच परंपरा उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराजांनी यशस्वीरीत्या सुरू ठेवली आहे. श्रमदानाच्या या परंपरेला अधिक गती देण्यासाठी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरी महाराजांनी देव-देश-धर्मासाठी वर्षभरात तब्बल १ कोटी २५ लाख ३४ हजार ५६७ तास महाश्रमदान करण्याचा संकल्प केला आहे. या अंतर्गत सोमवार(दि. ७)पासून ते १४ फेब्रुवारीपर्यंतचा पहिला सप्ताह भक्त परिवाराच्या राज्यभरातील विविध आश्रमात संपन्न होणार आहे. श्रमदानाच्या या मोहिमेत देशभरातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येत आहे.

श्रमप्रतिष्ठा वाढण्यासाठी आयोजित या महाश्रमदान सोहळ्यात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. (०७ ओझर आश्रम)

Web Title: Mahashramdan week started in a storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.