देवगाव येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 07:38 PM2019-05-07T19:38:41+5:302019-05-07T19:40:32+5:30
देवगाव : बारावे शतक हे खर्या अर्थाने क्र ांतियुग म्हटले पाहिजे. या कालखंडातच महात्मा बसवेश्वरांसारखा क्र ांतिकारक समाजसुधारक उदयास आला. मध्य युगाच्या बाराव्या/तेराव्या शतकात धर्मसुधारणेच्या माध्यमातुन विद्रोहाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत ऊतरवणारे महात्मा बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन देवगांव ग्रामपंचायत ऊपसरपंच विनोद जोशी यांनी केले.

देवगांव ग्रामपंचायत कार्यालयात विरशैव लिंगायत समाज बांधवांच्यावतीने महात्मा बसवेश्वरांच्या ८८८ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रामकृष्ण बोचरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील सुनिल बोचरे, सामाजिक कार्येकर्ते भागवत बोचरे, लहानु मेमाने आदीउपस्थित होते. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन उपसरपंच विनोद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या कार्याविषयी विनोन जोशी, मुरलीधर लोहारकर, भागवत बोचरे, वंसत अंढागळे, रांजेद्र कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच सांयकाळी ७ वाजेला श्री विश्वेश्वर मंदिरापासुन फटाक्याच्या आतषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची सजविलेल्या ट्रक्टरमधुन मिरवणुक काढण्यात आली.
यावेळी विरशैव लिंगायत समाज बांधवानी, महिलांनी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी शामराव लोहारकर, मुरलीधर लोहारकर, सुनिल खुळे, संजय लोहारकर, बाबा लोहारकर, जगदीश लोहरकर, बद्रीनाथ वाळेकर, संतोष निळकंठ, स्वप्निल लोहारकर, सचिन लोहारकर, महेश लोहारकर, अमोल लोहारकर आदी होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन दिनेश लोहारकर यांनी केले. तर आभार बद्रीनाथ लोहारकर यांनी मानले.