शेट्टीसाठी महासभा तहकुबीचे नाट्य भाजपाची खेळी : आज पुन्हा महापालिकेची महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:13 AM2017-11-21T00:13:47+5:302017-11-21T00:15:47+5:30
नाशिक : स्वीकृत सदस्य नियुक्तीनंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महापौरांनी सोमवारी (दि. २०) बोलाविलेली महासभा तहकूब करण्याची घोषणा केली असली तरी सध्या कारागृहात असलेले भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचे नगरसेवकपद वाचविण्यासाठीच पक्षाकडून महासभा तहकुबीचे नाट्य घडविले गेल्याची चर्चा आहे. पाच महिन्यांपासून गैरहजर असलेल्या शेट्टी यांना सोमवारच्या महासभेला हजर राहणे अनिवार्य होते, अन्यथा कायद्यानुसार त्यांचे पद रद्दबातल ठरू शकले असते; परंतु जामीन मिळूनही न्यायालयाचा अधिकृत आदेश प्राप्त होऊ न शकल्याने शेट्टी सोमवारच्याही महासभेला हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे महापौरांनी मंगळवारी (दि. २१) तहकूब महासभा बोलावली असून, त्यात शेट्टींची हजेरी लागल्यास पद वाचू शकते.

महासभेवर खुल्या जागांवर धार्मिक स्थळांचे बांधकाम अनुज्ञेय करण्यापासून ते तीन अधिकाºयांच्या स्वेच्छानिवृत्तीसंबंधीचे महत्त्वाचे प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे महासभेकडे लक्ष लागून होते; परंतु स्वीकृत सदस्यांची नियुक्तीची घोषणा केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी आश्चर्यकारकरीत्या सदर सदस्यांच्या आनंदोत्सवासाठी महासभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले आणि या आनंदोत्सवाबाबत विरोधकही बुचकळ्यात पडले. महापौरांनी सोमवारची महासभा तहकूब करत ती मंगळवारी (दि. २१) दुपारी २ वाजता बोलावली आहे. सभापटलावर धोरणात्मक विषय असताना महापौरांनी महासभा तहकूब केल्याने सदर खेळी ही भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचे पद वाचविण्यासाठीच असल्याची चर्चा सुरू झाली. एका गुन्हेगाराच्या खुनात सहभागी असल्याच्या आरोपावरून पंचवटीतील प्रभाग ४ मधील भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना २६ मे २०१७ रोजी अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून शेट्टी हे नाशिकरोड कारागृहात आहेत. आजच्या हजेरीकडे लक्षमहापौरांनी सोमवारी महासभेचे कामकाज पार पाडले असते तर नोव्हेंबरची मासिक सभा होऊन सलग सहा महिने गैरहजर राहिल्याबद्दल हेमंत शेट्टी यांना पद गमवावे लागले असते. परंतु, महापौरांनी सोमवारची महासभा केवळ स्वीकृत सदस्यत्वाची घोषणा करत मंगळवार दुपारपर्यंत तहकूब केली. त्यामुळे मंगळवारी होणाºया सभेला शेट्टी यांनी हजेरी लावल्यास त्यांचे पद वाचू शकते. दरम्यान, महापौरांनी मात्र सोमवारी महासभेवर धोरणात्मक विषय असल्याने आणि प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने सभेचे कामकाज तहकूब केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, तर भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी शेट्टी यांच्या पदाला कोणताही धोका नसल्याचे सांगत न्यायालयातील काही केस लॉचाही त्यांनी दाखला दिलेला आहे.