महाविकास आघाडीच खड्यांना जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 10:27 PM2020-09-18T22:27:02+5:302020-09-19T01:27:21+5:30
नाशिक- शहरातील खड्डे बुजवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपाच्या पाच वर्षे कार्यकाळातील रस्ते अत्यंत सुस्थितीत आहेत. मात्र, भाजपाच्या पाच ते बारा वर्षे दरम्यानच्या कालावधीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या काळात कोणाची सत्ता होती, त्याचे आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला भाजपाने दिला आहे.
नाशिक- शहरातील खड्डे बुजवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपाच्या पाच वर्षे कार्यकाळातील रस्ते अत्यंत सुस्थितीत आहेत. मात्र, भाजपाच्या पाच ते बारा वर्षे दरम्यानच्या कालावधीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या काळात कोणाची सत्ता होती, त्याचे आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला भाजपाने दिला आहे.
भाजपाच्या सत्तेच्या काळात विकास कामे वेगाने होत असल्याने विरोधी पक्षांकडून अकारण टीका केली जात असल्याचे पदाधिका-यांनी म्हंटले आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सत्तारूढ भाजपावर शरसंधान केले होते. खड्डड्यांना सत्तारूढ भाजपा जबाबदार असल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला होता. ठेकेदारांची साखळी असून त्यांच्यासाठीच खडड्डे ही समस्या निर्माण केली जात असल्याचा आरोप रंजन ठाकरे यांनी केला होता.
त्यावर उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृह नेता सतीश सोनवणे आणि गटनेता जगदीश पाटील यांनी उत्तर दिले आहे. खड्डे पडलेले रस्ते हे शिवसेना- राष्ट्रवादीच्या काळातील असल्याचा आरोप केला आहे. रस्ते दुरूस्तीच्या नावाखाली तीस कोटी रूपयांचे कंत्राट देण्याचा घाटत असल्याचा आरोप सुरू असला तरी त्याबाबत स्पष्टीकरण देताना २०१९-२० या वर्षाच्या अंदाजपत्रकात १४ कोटी रूपये रस्ते दुरूस्तीसाठी तर १३ कोटी २५ लाख रूपये हे खडी, मुरूम, सारखे मटेरीयल खरेदीसाठी आहे. तसेच जेसीबी,पोकलन भाड्याने
घेण्यासाठी देखील तरतूद आहे. सर्वसाधारणपणे १३०० किमी डांबरी आणि खडीच्या रस्त्यांची दुरूस्ती त्यात अपेक्षीत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून केबल टाकण्यासाठी रस्ते खोदल्याने त्या बदल्यात ३५ कोटी रूपये महापालिकेकडे जमा आहेत. गेल्या तीन वर्षात तयार करण्यात आलेले ६० कोटी रूपयांचे रस्ते सध्या ठेकेदाराकडे देखभाल दुरूस्तीच्या दायीत्व कालावधीत आहेत. त्यामुळे सध्या ज्या रस्त्यांवर खड्डे पडले ते भाजपाच्या सत्ताकाळातील नसून पाच ते १२ वर्षांपूर्वीच्या कालावधीतील अहोत. त्यावेळी महापालिकेत सत्ता कोणाची होती याचे आत्मपरिक्षण करा असा सल्ला देखील भाजपाच्या या पदाधिका-यांनी दिला आहे.