महावितरण आपल्या दारी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:40 AM2017-08-26T00:40:49+5:302017-08-26T00:40:58+5:30

ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवून अखंडित वीजपुरवठा देणे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच नियमित बिल भरून ग्राहकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सी.पी. वाडे यांनी केले. गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वीजग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात वाडे यांनी आवाहन केले.

 MahaVitaran is your campaign | महावितरण आपल्या दारी अभियान

महावितरण आपल्या दारी अभियान

Next

नायगाव : ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवून अखंडित वीजपुरवठा देणे जसे आमचे कर्तव्य आहे, तसेच नियमित बिल भरून ग्राहकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सी.पी. वाडे यांनी केले. गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वीजग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात वाडे यांनी आवाहन केले. याप्रसंगी सरपंच अनिता जेजूरकर, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, माजी सरपंच इंदुमती कातकाडे, अर्जुन बोडके, महावितरणचे अभियंता अनिल थोरात, सहाय्यक अभियंता राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते. घरगुती व कृषीच्या सर्व ग्राहकांना वीज ट्रान्सफॉर्मरचे फ्युज, जीर्ण तारा बदलणे, रोहित्रावर झालेला जास्तीचा भार, रोहित्र बदलणे, वाढीव वीजबिल येणे, विजेचे खांब बदलणे
आदींसह विविध तक्रारी नायगाव परिसरातील वीज ग्राहकांनी उपस्थित केले. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी तक्र ार निवारण मेळावे सुरू करून वीजग्राहकांसाठी हा चांगला उपक्र म असल्याचे मत गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे यांनी मांडले. ग्रामपंचायत सदस्य रोशन गायकवाड, दत्तात्रय तांबे, शरद कापडी, वडझिरेचे अर्जुन बोडके, जायगावचे जयराम काकड उपस्थित केले.

Web Title:  MahaVitaran is your campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.