चांदवड तालुक्यात वीज ग्राहकासाठी महावितरणचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:45 PM2018-08-08T17:45:34+5:302018-08-08T17:47:15+5:30

चांदवड - चांदवड उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वडनेरभैरव येथे महावितरण तर्फे वीज ग्राहकामध्ये जागृती करण्यााच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती चांदवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांनी दिली. वडनेरभैरव येथील कार्यरत असणाºया आठ जनमित्राच्या मोटारसायकलमध्ये स्पीकर यंत्रणा बसवुन त्याद्वारे गावागावामध्ये , वाडी, वस्तीमध्ये वीज बील नियमीत भरणे, वीज चोरी करु नये, सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी राबविण्यात येणाºया महावितरण कंपनीच्या विविध योजनाची माहीती त्यात सौभाग्य योजना, एच.व्ही. डी.एस. योजना, नल संजिवनीय योजना, कृषी संजीवनी योजना , पी.डी. अ‍ॅमेनेस्टी योजना आदि विविध प्रकारच्या योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येत आहे.

 Mahavitaran's innovative venture for electricity customers in Chandwad taluka | चांदवड तालुक्यात वीज ग्राहकासाठी महावितरणचा अभिनव उपक्रम

चांदवड तालुक्यात वीज ग्राहकासाठी महावितरणचा अभिनव उपक्रम

Next
ठळक मुद्देविविध प्रकारच्या योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येत आहे.

चांदवड - चांदवड उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वडनेरभैरव येथे महावितरण तर्फे वीज ग्राहकामध्ये जागृती करण्यााच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती चांदवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांनी दिली. वडनेरभैरव येथील कार्यरत असणाºया आठ जनमित्राच्या मोटारसायकलमध्ये स्पीकर यंत्रणा बसवुन त्याद्वारे गावागावामध्ये , वाडी, वस्तीमध्ये वीज बील नियमीत भरणे, वीज चोरी करु नये, सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी राबविण्यात येणाºया महावितरण कंपनीच्या विविध योजनाची माहीती त्यात सौभाग्य योजना, एच.व्ही. डी.एस. योजना, नल संजिवनीय योजना, कृषी संजीवनी योजना , पी.डी. अ‍ॅमेनेस्टी योजना आदि विविध प्रकारच्या योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येत आहे. सदर उपक्रम हा महावितरण कंपनीचे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, प्रभारी अधिक्षक अभियंता मनेष ठाकरे, चांदवडचे कार्यकारी अभियंता मधुसूदन वाडे यांचे मार्गदर्शनाखाली चांदवड उपविभागाचे उपकार्यकारी नीलेश नागरे, वडनेरभैरव शाखा अभियंता प्रकाशचंद्र भोये व त्यांचे सर्व जनमित्र यांनी यशस्वीरित्या राबविली. यावेळी जनमित्र तेजस खैरनार, गोविंदा राऊत, काशीनाथ बोके, श्रीधर कमुनकर, बाळासाहेब साळुंके, विष्णु तांदळे,प्रकाश बोरसे, चव्हाण, विलास अहेर, राजु बस्ते, अशा सर्वाच्या मोटारसायकलीला लावलेल्या स्पिकर सिस्टीमद्वारे जनजागृत्ती करण्यात येत आहे. ग्राहकामधुन या उपक्रमास प्रतिसाद मिळत असून संपुर्ण चांदवड उपविभागाच्या सर्व शाखा कार्यालयातंर्गत सदर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नागरे यांनी सांगीतले.

Web Title:  Mahavitaran's innovative venture for electricity customers in Chandwad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.