विधानसभेच्या युद्धासाठी महायुती सज्ज : चव्हाण
By admin | Published: August 18, 2014 11:18 PM2014-08-18T23:18:53+5:302014-08-19T01:23:18+5:30
विधानसभेच्या युद्धासाठी महायुती सज्ज : चव्हाण
पेठ : लोकसभेचे रणांगण गाजवल्यानंतर आता आगामी विधानसभेच्या महायुद्धासाठी आदिवासी भागातील महायुतीच्या शिलेदारांनी तयार व्हावे, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले़ पेठ तालुक्यातील विविध विकासकामांचा उद्घाटन व खासदार चव्हाण यांचा सत्कार समारंभ आमदारधनराज महाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला़ यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ठक्करबाप्पा, १३वा वित्त आयोग, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत ४७ विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला़ यामध्ये रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण, सभामंडप, गावअंतर्गत रस्ते, दशक्रियाविधी शेड आदिंचा समावेश आहे़ पंचायत समिती सभागृहात पेठ तालुक्याच्या वतीने जि़ प़ सदस्य भास्कर गावित यांनी खासदार चव्हाण यांचा सत्कार केला़ त्यानंतर विविध संघटनांनीही यावेळी खासदार हरिश्चंद्रचव्हाण यांचा सत्कार केला़
आमदार महाले, सभापती अंबादास चौरे, जि़ प़ सदस्य हेमलता गावित, उपसभापती महेश टोपले, पं़ स़ सदस्य जयश्री वाघमारे, भाजपा अध्यक्ष रामदास भोये, श्यामराव गावित, मोहन कामडी, कांतीलाल राऊत, सुशीला अलबाड, रामदास वाघेरे, गटविकास अधिकारी एस़ आऱ तांबेकर, पोलीस निरीक्षक व्ही़ डी़ ससे, तालुका कृषी अधिकारी शशिकांत पवार यांच्यासह पेठ तालुक्यातील सेना-भाजपा कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़