सटाण्यात महेश नवमी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:42 PM2019-06-12T14:42:25+5:302019-06-12T14:42:58+5:30
सटाणा : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषेत समाजबांधव सहभागी झाले होते.
सटाणा : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषेत समाजबांधव सहभागी झाले होते. नवमी माहेश्वरी समाजाच्या उत्पत्तीचा दिवस असून, माहेश्वरी समाजाची उत्पत्ती महादेवाच्या वरदान स्वरूपात झाल्याचे मानले जाते. महेश नवमी माहेश्वरी धर्मवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा प्रमुख सण आहे.
भगवान महेश यांचा रथ फुलांनी सजविण्यात आला होता. सकाळी शहरातील बालाजी मंदिरापासून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत पुरुषांनी पारंपारिक पांढरे वस्त्र तर महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या असा पेहराव केला होता. टिळक रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वळसा घालून बसस्थानकासमोर महात्मा फुले रोड, यशवंतराव महाराज मंदिर, महालक्ष्मी मंदिरापासून बालाजी मंदिर येथे शोभायात्राचा समारोप करण्यात आला. समाजाचे कार्यकर्ते प्रतीक भांगडीया यांनी सपत्नीक महाआरती केली. समारोपानंतर राजस्थान मंगल कार्यालयात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रगती मंडळाचे अध्यक्ष प्रदीप सोनी, युवक मंडळाचे अध्यक्ष वृषभ भांगडीया, समाजिक कार्यकर्ते किशोर भांगडीया, राजाराम भांगडीया, पंकज नवगजे, राजेंद्र भांगडीया, अनुज भांगडीया, कमलकिशोर भांगडीया, महेश भांगडीया, मनीष भांगडीया, नंदकिशोर भांगडीया, शांतीलाल भांगडीया, बाळासाहेब भांगडीया, पवन काला, अंकुश भांगडीया, विपुल अग्रवाल, हरिष भांगडीया, यश भांगडीया आदींसह समाजातील महिला मंडळ व जय महेश मंडळाचे कार्यकर्ते व आबालवृद्ध सहभागी होते.