कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी महेशनवमी ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:12 AM2021-06-26T04:12:07+5:302021-06-26T04:12:07+5:30
या दिवशी मोजक्याच समाज बांधवांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात नाशिकरोड येथील माहेश्वरी भवनमध्ये भगवंताचं पूजन, आरती व ध्वजारोहण करण्यात आलं. ...
या दिवशी मोजक्याच समाज बांधवांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात नाशिकरोड येथील माहेश्वरी भवनमध्ये भगवंताचं पूजन, आरती व ध्वजारोहण करण्यात आलं. संपूर्ण विश्वाला महामारीपासून सुटका मिळावी, यासाठी प्रार्थना कण्यात आली. यावेळी विशेष उपलब्धी मिळालेल्या समाज बांधवांचा गौरव करण्यात आला.
हप्ताभर गुगलच्या माध्यमाने सर्वांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा, चेस, कॅरम, हौजी यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांद्वारे रामरक्षा, फेस योगा, कुकिंग यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान झूमच्या माध्यमातून आयोजित केले. कोरोना काळात दुःखद घटना घडलेल्या समाजाच्या परिवारांना सांत्वन भेट देऊन त्यांना प्रसाद वाटण्यात आला.
महेशनवमी यशस्वी करण्यासाठी अशोक तापडिया, श्रीनिवास लोया, अंकुश सोमाणी, लीला राठी, सारिका करवा, अच्युत राठी, रामेश्वर मालानी, मुकेश चांडक, दिनेश करवा, रामेश्वर जाजू, अमर मालपानी, आशिष कलंत्री, पवन मुंदडा, राधेश्याम राठी, अर्चना लोया आदींनी प्रयत्न केले.