‘पाणी बचती’चा संदेश देत माहेश्वरी बहू मंडळाची वॉकेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:40 AM2019-03-18T01:40:08+5:302019-03-18T01:40:37+5:30
नाशिकरोड : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी माहेश्वरी बहू मंडळातर्फे नाशिकरोड येथे पाच किलोमीटर अंतराची ...
नाशिकरोड : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी माहेश्वरी बहू मंडळातर्फे नाशिकरोड येथे पाच किलोमीटर अंतराची वुमेन वॉकेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या उपक्र माचे हे दुसरे वर्ष होते. या उपक्र मात आठशे मुली व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मुक्तिधाममागील महापालिका शाळा क्रमांक १२५च्या मैदानावर सकाळी ७.३० वाजता उद्घाटन झाले. कामिनी तनपुरे, नलिनी कड, बहु मंडळाच्या अध्यक्ष शीतल राठी, उपाध्यक्षा कविता राठी, सचिव सारिका करवा, सहसचिव सीमा कासट, खजिनदार अर्चना लोया यांनी हिरवा झेंडा दाखविला. उपक्रम समिती सदस्य प्रीती बूब, कविता लाहोटी, संगीता राठी, मीनल बियाणी, धनश्री चांडक, कविता राठी, अलका करवा, आशा जाजू, नीता जाजू, संगीता बांगड, वर्षा कलंत्री, निशा सोमाणी, दीपा बूब, प्रणिता भुतडा, श्रृती गट्टानी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपक्रमात सहभागी स्पर्धकांनी पाणी बचतीचा संदेश दिला़ पाणी जणून वापरा पाण्याची नासाडी टाळा, असे यावेळी आवाहन करण्यात आले़
प्रियंका तापडिया यांनी सूत्रसंचालन केले. वॉकेथॉनच्या संयोजनासाठी माहेश्वरी समाजाचे श्रीनिवास लोया, अशोक तापडिया, उमेश बूब, महेश बूब, नंदू बूब, दिनेश करवा, अंकुश सोमाणी, मयूर करवा, गिरीश राठी, अमर मालपाणी, मनोज भुतडा, सचिन सोमानी, मुकेश चांडक, रमेश कासट, कल्पेश लोया आदींनी मदत केली. माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी युवा मंच, माहेश्वरी प्रगती मंडळ, जेसीआय, नाशिकरोड पोलीस व वाहतूक पोलीस यांचे सहकार्य लाभले.
मुक्तिधाम, बिटको चौक, जेलरोडची सेंट फिलोमिना शाळा येथून परत महापालिका शाळा क्र मांक १२५ असा वॉकेथॉनचा मार्ग होता. पन्नास वर्षांवरील आणि पन्नास वर्षांखालील असे दोन गट होते. एकूण वीस बक्षिसे यावेळी देण्यात आली. नाशिकहून सहा परीक्षकांनी वॉकेथॉनचे परीक्षण केले.