प्रत्येक जिल्ह्यात महिला बालविकास भवन उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:22+5:302021-05-07T04:16:22+5:30
नाशिक जिल्ह्यात कोरोनाकाळात जिल्हा परिषदेने राबविलेला ‘एक मूठ पोषण आहार’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे बालकांचे कुपोषण कमी ...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाकाळात जिल्हा परिषदेने राबविलेला ‘एक मूठ पोषण आहार’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे बालकांचे कुपोषण कमी होण्यास नक्कीच मदत झाली असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले. बैठकित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भागात महिला व बालकांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच अंगणवाडी व शाळा यांच्या बांधकामांच्या सद्यस्थितीची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना सादर केली. यावेळी आ. माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, सभापती अश्विनी आहेर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न औषध प्रशासनाचे दुष्यंत भामरे, महिला व बालविकास विभागाचे चंद्रशेखर पगारे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील, दीपक चाटे आदी उपस्थित होते.
चौकट====
अनधिकृत दत्तक होऊ नये
कोरोनाकाळात बालकांना दत्तक घेणे व देणे याबाबत समाजमाध्यमांवर विविध संदेश येत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही बालकाचे अनधिकृतपणे दत्तक देवाण - घेवाण होऊ नये, यासाठी योग्य ते नियोजन करावे. तसेच स्थलांतरित महिला व बालकांना योग्य त्या सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचनाही ठाकूर यांनी दिल्या.
(फोटो ०६ ठाकूर)