महिंद्रा निवडणुकीत ८ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:05+5:302021-02-11T04:17:05+5:30

सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कामगार संघटनेची निवडणूक घेण्यात यावी म्हणून विरोधकांनी जिल्हाधिकारी आणि न्यायालयात धाव घेतली होती. ...

In Mahindra elections, 74 candidates are contesting for 8 seats | महिंद्रा निवडणुकीत ८ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात

महिंद्रा निवडणुकीत ८ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात

Next

सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कामगार संघटनेची निवडणूक घेण्यात यावी म्हणून विरोधकांनी जिल्हाधिकारी आणि न्यायालयात धाव घेतली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार२०२१ ते २०२४ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी नंतर अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्यासह आठ तर उपाध्यक्ष व सरचिटणीस पदासाठी प्रत्येकी आठ उमेदवार आहेत. खजिनदार पदासाठी सात तर चिटणीसपदासाठी १५ उमेदवार आहेत. सहचिटणीसपदासाठी नऊ, कमिटी मेंबर अ साठी बारा, कमिटी मेंबर ब साठी सात उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी कंपनीच्या आवारात मतदान आणि त्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत २ हजार ३०० मतदार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही निवडणूक घेण्यात येणार आहे.

Web Title: In Mahindra elections, 74 candidates are contesting for 8 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.