१८ हजार शेतकऱ्यांना मिळणार उच्चदाब जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:46 PM2018-07-05T16:46:31+5:302018-07-05T16:51:36+5:30

mahvitran,compony,connecation, farmers | १८ हजार शेतकऱ्यांना मिळणार उच्चदाब जोडणी

१८ हजार शेतकऱ्यांना मिळणार उच्चदाब जोडणी

Next
ठळक मुद्देनिविदा जाहीर : एचव्हीडीएसमधून होणार २४८ कोटींची कामेपरिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना लाभ


नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.
परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्यासाठीच्या प्रक्रि येला सुरु वात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात परिमंडळात होणाऱ्या  ४०९ कोटी रुपये खर्च असलेल्या कामांच्या निविदा महावितरणने प्रसिद्ध केल्या आहेत. यातून नाशिक जिल्ह्यात २४८ कोटी रु पये किमतीच्या कामातून जवळपास १८ हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार आहे.
मार्च-२०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे जोडणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून नाशिक परिमंडळातील २९ हजार ४४० शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे, तर परिसरातील इतर  शेतकऱ्यांना ही योजनेतून होणाºया कामांचा लाभ मिळणार आहे. योजनेत एक किंवा दोन, कमाल तीन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोवॉटचे स्वतंत्र रोहित्र उभारण्यात येणार आहेत.
परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढते व आकडे टाकून वीजचोरी करण्यास वाव मिळतो. सध्या ६५ व १०० किलोवॉटच्या रोहित्राद्वारे २० ते २५ शेतीपंपांना जोडणी देण्यात येते. या व्यतिरिक्त आकडे टाकून चोऱ्या  करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. परिणामी रोहित्रांवर ताण येऊन वीजपुरवठ्यात अडथळे व रोहित्र जळण्याचे होण्याचे प्रमाण वाढण्यासोबत योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. उच्चदाब वीज वितरण प्रणालीमुळे या सर्वच समस्या दूर करता येणे शक्य होते.
उच्चदाबाने थेट वीजपुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात कमालीची घट होईल व याप्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीजजोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरु स्त होण्याच्या  तक्रारी  दूर होतील, योग्य दाबाने वीजपुरवठा शक्य होणार आहे.

Web Title: mahvitran,compony,connecation, farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.