मक्याला १८२७ रुपये उच्चांकी दर प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:19 AM2019-01-11T01:19:28+5:302019-01-11T01:20:38+5:30

मक्याच्या दरामध्ये तेजी आली आहे. सटाणा बाजार समितीत सर्वाधिक प्रतिक्विंटल १८२७ रुपये प्रतिक्विंटल असा मक्याला उच्चांकी भाव मिळाला. सरासरी दर १८०० रुपये भाव होता.

Maika received a high rate of Rs 1,827 | मक्याला १८२७ रुपये उच्चांकी दर प्राप्त

मक्याला १८२७ रुपये उच्चांकी दर प्राप्त

Next

सटाणा : मक्याच्या दरामध्ये तेजी आली आहे. सटाणा बाजार समितीत सर्वाधिक प्रतिक्विंटल १८२७ रुपये प्रतिक्विंटल असा मक्याला उच्चांकी भाव मिळाला. सरासरी दर १८०० रुपये भाव होता.
येथील बाजार समिती आवारात गुरुवारी (दि. १०) मक्याची सरासरी सातशे क्विंटल आवक होती. गेल्या चार दिवसांपासून मक्याच्या दरामध्ये तेजी आली असून, अचानक शंभर ते सव्वाशे रुपयांनी मक्याचे भाव वाढले आहेत. गुरूवारी मक्याला सर्वाधिक प्रतिक्विंटल १८२७ रु पये तर सरासरी १८०० रु पये भाव होता.
दरम्यान, बाजरी, गहूदेखील तेजीत असून बाजरी प्रतिक्विंटल २००० रुपये तर गहू २१८१ रुपये भावाने विकला गेला.
दरम्यान, उन्हाळी व लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
उन्हाळ कांद्याची साडेचार हजार क्विंटल तर लाल कांद्याची साडेबारा हजार क्विंटल आवक झाली. दरम्यान चांगल्या प्रतीचा उन्हाळ कांदा व्यापारी खरेदी करीत असून खराब कांदा मात्र नाकारत आहेत.

Web Title: Maika received a high rate of Rs 1,827

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.