मराठा क्रांती मोर्चा नावाने पक्ष स्थापनेला नाशिकमधून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:03 PM2018-10-29T18:03:29+5:302018-10-29T18:09:57+5:30

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व तुषार जगताप यांनी सोमवारी (दि.२९) शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली. 

The main goal is to get reservation for the opposition from Nashik to form party in the name of Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चा नावाने पक्ष स्थापनेला नाशिकमधून विरोध

मराठा क्रांती मोर्चा नावाने पक्ष स्थापनेला नाशिकमधून विरोध

Next
ठळक मुद्देमराठा समाजाच्या पक्ष स्थापनेला नाशिकमधून विरोधसमाजाला आरक्षण मिळविण्यासाठी एकजूट टिकविण्याचे आवाहन

नाशिक : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व तुषार जगताप यांनी सोमवारी (दि.२९) शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली. 
मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट आरक्षण प्राप्त करणे आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मराठा संघटनांच्या पक्ष स्थापनेशी संबंध नसून नाशिकसोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव येथील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचाही पक्ष स्थापनेला विरोध असल्याचे सांगतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने पक्षाची निर्मिती करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समन्वयकांनी सांगितले. गेल्या आठवड्यात नवीन मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा नावाने पक्ष अथवा संघटनांची स्थापना करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, अशा प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी त्यांना कडाडून विरोध करण्याची भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाची हीच भूमिका असून, नशिकमधूनही पक्ष स्थापनेला विरोध असल्याचे नाशिकच्या समन्वयकांनी सांगितले. यावेळी पुंडलिक बोडके, सचिन पवार, अमित नडगे, विशाल कदम आदी उपस्थित होते. 

कोणीही नेता नाही 
मराठा क्रांती मोर्चात कोणीही नेता, मार्गदर्शक, पाठीराखा अथवा रसद पुरविणारा व्यक्ती नाही, हे मोर्चाचे ठळक वैशिष्ट्य आहे.‘ एक मराठा, लाख मराठा’ हे घोषवाक्य घेऊन मराठा समाज आपसातील मतभेद, पक्ष, संघटना विसरून एकवटला होता. ही एकजूट अशीच पुढेही कायम राहावी यासाठी मराठा समाजाचा कोणताही विशिष्ट पक्ष, संघटना अथवा नेता असणार नसल्याचेही नाशिकच्या समन्वयकांनी स्पष्ट केले.
 

Web Title: The main goal is to get reservation for the opposition from Nashik to form party in the name of Maratha Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.