मुख्य बाजारपेठा बंद; उपनगरांत सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 01:33 AM2021-04-07T01:33:02+5:302021-04-07T01:33:44+5:30
कोराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने ब्रेक द चेन धोरण आखले असून, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याच्या आदेशाला मंगळवारी (दि.६) मुख्य बाजारपेठांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कमी झाली नाही. तसेच मुख्य बाजारपेठ आणि मुख्य रस्तेवगळता उपनगरात आणि अन्यत्र दुकाने सुरूच होती.
नाशिक : कोराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने ब्रेक द चेन धोरण आखले असून, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याच्या आदेशाला मंगळवारी (दि.६) मुख्य बाजारपेठांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कमी झाली नाही. तसेच मुख्य बाजारपेठ आणि मुख्य रस्तेवगळता उपनगरात आणि अन्यत्र दुकाने सुरूच होती.
कोरोनाचा संसर्ग वाढत असून, लॉकडाऊन टाळण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, शनिवार व रविवार पूर्णत: व्यवहार बंद असल्याने सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुकाने, व्यवसाय आणि खासगी ऑफिसेस सुरू ठेवायचे काय, याबाबत सोमवारी संभ्रमाचे वातावरण होते. जिल्हा प्रशासनाकडून त्याला ठाेस उत्तर सुरुवातीला मिळाले नाही. मात्र सायंकाळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर अत्यावश्यक सेवावगळता अन्य सर्वच खासगी आस्थापना बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र तरीही अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये संभ्रम कायम असल्याचे मंगळवारी (दि.६) दिसून आले. नाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठा सामान्यत: सकाळी ९ वाजेनंतरच सुरू होतात. त्यातच पोलिसांनी बाजारपेठेकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेडने अडवून ठेवले होते. मात्र, यानंतरही अनेक व्यापारी - व्यावसायिकांनी दुकाने उघडण्याच्या तयारीने कामगार-
कारागिरांना बोलवून ठेवल्याने दुकानाच्या बाहेर आणि चौकात अनेक घोळके उभे होते.
केवळ पार्सल सेवा
उपाहारगृह, मिसळ विक्री अशा अनेक ठिकाणांहून केवळ पार्सल सेवाच सुरू हेाती. खाद्यपदार्थ आणि भाजीपाल्याची दुकाने सुरू असल्याने नागरिकांना फारशी गैरसोय
पहिल्या दिवशी जाणवली नाही. मात्र अनेक ठिकाणी अर्धे शटर डाऊन करून दुकाने सुरू असल्याचेही आढळले.
कामगारांची गर्दी
सिडकोत घरातच दुकाने असलेली अनेक छोटी दुकाने सुरू होती. नाशिकरोडला उपनगरात दुकाने खुली असल्याचे चित्र होते. पंचवटीत वेगळी स्थिती नव्हती. काही भागात तर बंदचा मागमूसही नव्हता. सातपूरला मुख्य बाजारपेठेत बंदचे वातावरण असले तरी कारखाने सुरू असल्याने कामगारांची वर्दळ कायम होती.
n शहरातील सराफ बाजार, भांडी बाजार, कापडपेठ, मेनरोड, शिवाजीरोड, गाडगे महाराज चौक, रविवार कारंजा, शालिमार अशा सर्वच भागात दुकाने पूर्णत: बंद होती. केवळ खाद्यपदार्थ, उपाहारगृह तसेच औषध दुकानेच सुरू हाेती. काही भागात फेरीवाले वस्तूंची विक्री करीत असल्याचे आढळले. गंगापूररोड, त्र्यंबकरोड, कॉलेजरोड या भागातही दुकाने बंद होती. मात्र, अंतर्गत कॉलनी, काही व्यापारी संकुले येथे शटर अनेक दुकाने सहजपणे सुरू होती.
n नाशिकरोड परीसरात सकाळपासून मुख्य बाजारपेठेते शुकशुकाट होता. दुपारनंतर बंद दुकानांच्या समोर भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली. त्यामुळे थोडीफार वर्दळ दिसली.
n बंद बाबत व्यापाऱ्यांमध्ये सभ्रम असल्याने सकाळीच काही ठिकाणी दुकाने उघडण्यात आली होती. मात्र, पोलीसांनी आवाहन केल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली. मुख्य बाजारपेठा बंद असल्या तरी रस्त्यांवर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर होती.यामुळे बंद करूनही गर्दी कमी झाली असल्याचे जाणवले नाही.