विरगावचा मुख्य रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:54 PM2019-09-17T22:54:34+5:302019-09-17T22:54:44+5:30
विरगाव : विरगाव ते विरगाव फाटा या अर्धा किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून संबधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही ह्या रस्त्याच्या दुरु स्तीकडे लक्ष्य दिले जात नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विरगाव : विरगाव ते विरगाव फाटा या अर्धा किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून संबधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही ह्या रस्त्याच्या दुरु स्तीकडे लक्ष्य दिले जात नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
साक्र ी-शिर्र्डी राष्ट्रीय महामार्गालगत सुमारे साडेपाच हजार लोकसंख्या असलेलं विरगाव हे गाव सद्यस्थितीत प्रवेशद्वारावरील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे चर्चेत आहे.
या गावाच्या प्रवेशद्वारावरील मुख्य रस्ताच अनेक वर्षांपासून पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्याच्या साईडपट्याही फूटभर खाली गेल्या असून सद्यस्थितीत संपूर्ण रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
पंधरा वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजीही झालेली नसल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या ह्या रस्त्याचे मजबुतीकरण करावे यासाठी विरगाव ग्रामपंचायतीकडून वारंवार पत्रव्यवहार ही करण्यात आला आहे. मात्र अद्याप पर्यंत या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रस्ता दुरु स्तीसाठी ग्रामपंचायतीकडून वारंवार जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अनेक वेळा साधना गवळी यांची भेट घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची विनंतीही करण्यात आली आहे. मात्र अजूनही या कामास मंजुरी मिळालेली नाही.
- ज्ञानेश्वर देवरे, सरपंच, विरगाव.
विरगाव हे मध्यवर्ती गाव असल्याने येथून दररोज दहा ते बारा ट्रक शेती माल घेऊन गुजरात राज्याकडे ये- जा करीत असतात. मात्र हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने वाहन चालविणे अत्यंत जिकिरीचे होऊन बसले आहे. तात्काळ या रस्त्याची दुरु स्ती होणे गरजेचे आहे.
- उद्धव निकम, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक.
(फोटो १७ विरगाव)