गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:56 AM2018-12-11T00:56:43+5:302018-12-11T00:57:14+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करून दोन दिवसानंतर अचानक काम बंद करण्यात आल्याने गावात या कामाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
गिरणारे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गिरणारे गावातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करून दोन दिवसानंतर अचानक काम बंद करण्यात आल्याने गावात या कामाबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
रस्त्याचे काम अचानक बंद झाल्याने वाहतुकीला व येणाऱ्या जाणाºया नागरिकांच्या दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून चारचाकी वाहने पास झाल्यास टायरखालील दगड उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांवर व तेथील ग्राहकांवर जाऊन दुखापत होण्याचा घटना घडत असून, ठेकेदाराने रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी गिरणारे गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. नाशिक तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणून परिसरातील गावांची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गिरणारे गावातील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली होती.
ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने आमदार निधीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हे काम ठेकेदाराकडून करून घेतले जाणार आहे. या कामाला ठेकेदाराने उशिराने का होईना मात्र सुरुवात केली होती, मात्र कामाला
कुठेतरी बाधा आली आणि दोन दिवस सुरू असलेले हे काम अचानकपणे बंद झाले. रस्त्याचे काम बंद होऊन साधारण पंधरा दिवस झाले मात्र अजून कामाची सुरु वात झाली नसल्याने गावातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
काम अचानक बंद करायचे नेमके कारण काय?
रस्त्याच्या मधोमध जेसीबीच्या साहाय्याने खणल्याने रस्त्यात मोठा खड्डा तयार होऊन त्याचे बारीक बारीक दगड गाडीच्या टायरखाली येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दुकानात जाऊन दुखापत व सामानाची नुकसान होऊन रस्त्यावरची धूळ उडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंद असलेले हे काम त्वरित सुरु कारण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांकडे केली.
४या रस्त्यावर येणाºया जाणाºया शाळकरी मुलांना सायकलीवरून येता जाता खडीवरून घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. हे काम चालू करतांना मात्र याठिकाणी बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसल्याने ठेकेदार नेमके कशे काम करतो याचा अंदाज लावणे कठीणच असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
४त्यातल्या त्यात दोन दिवसानंतर हे काम अचानक बंद करायचे नेमके कारण काय? असा सवाल नागरिकांनी केला आहे. याठिकाणी १० गावाचा मिळून दर गुरु वारी आठवडे बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना व वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.