मेनरोड मनपा कार्यालय स्थलांतराच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:19 AM2019-08-28T00:19:33+5:302019-08-28T00:19:58+5:30

मेनरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय धोकादायक आणि गैरसोयीचे ठरत आहे. नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने येथील महापालिकेच्या पुरातन इमारतीचा काही भाग ढासळला होता.

 Mainroad Municipal Office awaiting transfer | मेनरोड मनपा कार्यालय स्थलांतराच्या प्रतीक्षेत

मेनरोड मनपा कार्यालय स्थलांतराच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

इंदिरानगर : मेनरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय धोकादायक आणि गैरसोयीचे ठरत आहे. नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने येथील महापालिकेच्या पुरातन इमारतीचा काही भाग ढासळला होता. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. सदर इमारतीमधील कामकाज स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अजूनही जुन्याच इमारतीत कामकाज सुरू आहे.
गेल्या महिन्यात प्रभाग सभेत धोकादायक इमारतीतून विभागीय कार्यालय स्थलांतरित करावे, त्यासाठी नगरसेवक मुशीर सय्यद व नगरसेवक श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. तसेच इतर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तरीही अद्यापपर्यंत विभागीय कार्यालय स्थलांतर करण्यात आले नाही. विभागीय कार्यालयात सुमारे पाचशे कर्मचारी येथे काम करतात. तसेच दररोज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने नागरिक ये-जा करीत असतात. त्यामुळे प्रशासन मोठी दुर्घटनेची वाट पाहते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय कार्यालय कर्मचारी आणि नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत असून, द्वारका सर्कललगत मध्यवर्ती ठिकाणी पूर्व विभागाचे कार्यालय स्थलांतर करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून आहे. या कार्यालयात वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनतळ अपुरे पडत असल्याने तेथे येणाºया नागरिकांना वाहन लावण्यास जागा पुरत नाही. नाईलाजाने मेनरोडवर वाहने लावावी लागतात. येथे पिण्याची पाण्याची सोयसुद्धा नाही.
मुहूर्त लागेना
महापालिकेचे बहुतेक विभागीय कार्यालय नूतन इमारतीत स्थलांतर झाले आहे. पूर्व विभागाचे विभागीय कार्यालय नूतन इमारतीत केव्हा स्थलांतरित होईल. सदर पुरातन इमारतीच्या जतन करावे विभागीय कार्यालयात येताना मेनरोड येथील रस्त्यावर ठिकठिकाणी उभे असलेले विक्र ेत्यांच्या हातगाड्यांमुळे पादचाऱ्यांना मार्गक्र मण करणे सुद्धा मुश्किल होते, तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. पूर्व विभागीय कार्यालयाच्या वतीने लाखो रु पयांचा घरपट्टी व पाणीपट्टीच्याद्वारे महसूल गोळा केला जातो, परंतु अद्यापही नूतन इमारतीच्या प्रतीक्षेत आहे.
नगरसेवकांना चारचाकी वाहने लावण्यासाठीसुद्धा जागा नसते. त्यामुळे बहुतेक नगरसेवक शालिमार येथील मनपाच्या वाहनतळावर वाहने लावून पायपीट करीत मेनरोड येथील कार्यालयात येतात. सर्वच दृष्टीने सदर कार्यालय गैरसोयीचे ठरत आहे.

Web Title:  Mainroad Municipal Office awaiting transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.