बिनविरोध निवडीचा ९० वर्षांचा वसा कायम राखला

By admin | Published: January 31, 2016 10:28 PM2016-01-31T22:28:25+5:302016-01-31T22:33:18+5:30

बाणगाव विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

Maintaining 90-year-old fat of uncontested choice | बिनविरोध निवडीचा ९० वर्षांचा वसा कायम राखला

बिनविरोध निवडीचा ९० वर्षांचा वसा कायम राखला

Next

नांदगाव : लोकशाहीत निवडणूक जेवढी छोटी तेवढे स्पर्धक जास्त असल्याचा अनुभव येत असतो. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी संस्था यांसारख्या निवडणुकांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत असते.
या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्यातील बाणगाव बु.ची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अपवाद ठरावी. यात स्थापनेपासून निवडणूक नाही व चेअरमनही बदलले नाहीत. नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा हा इतिहास नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झाला. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. विजयी संचालकांत प्रकाश कवडे, शांताराम कवडे, शांताराम कवडे, गंगाराम कवडे, सुकदेव कवडे, चांगदेव देवकर, महेंद्र बनगर, फकिरा फणसे, संजय लासुरे, शोभाताई कवडे, सीमा संतोष कवडे, भगवान कोळेकर, अर्जुन करडे यांचा समावेश आहे. सदर संस्थेची स्थापना १९२६ मध्ये झाली. सुरुवातीस भौरी, टाकळी व बाणगाव अशी ग्रुप सोसायटी होती.
कालांतराने बाणगाव बु. व खुर्द असे स्वरूप झाले व आता फक्त बाणगाव बु. असे कार्यक्षेत्र राहिले. स्थापनेपासून येथे निवडणूक नाही. संस्थेच्या चेअरमनपदी गेली ४५ वर्षे प्रकाश (बापूसाहेब) कवडे विराजमान आहेत. येत्या काही दिवसांत चेअरमनपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा प्रकाश कवडे हेच चेअरमन होतील, असे मत निवडून
आलेल्या संचालकांनी व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Maintaining 90-year-old fat of uncontested choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.