मांडवड, लक्ष्मीनगरला रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:36 PM2019-11-29T23:36:23+5:302019-11-30T01:02:23+5:30
मांडवडसह लक्ष्मीनगर या दोन्ही गावांच्या रस्त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक रस्त्याच्या समस्यांनी त्रस्त झाले असून, कोणाकडे दाद मागायची? परतीच्या पावसामुळे तर मांडवडजवळील मध्य रेल्वेच्या पांझण पुलाखालील पाणी जैसे थेच आहे. त्या पुलाखालूनच नागरिक नांदगावला येण्यासाठी कसाबसा पूल पार करीत आहे
मांडवड : मांडवडसह लक्ष्मीनगर या दोन्ही गावांच्या रस्त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक रस्त्याच्या समस्यांनी त्रस्त झाले असून, कोणाकडे दाद मागायची? परतीच्या पावसामुळे तर मांडवडजवळील मध्य रेल्वेच्या पांझण पुलाखालील पाणी जैसे थेच आहे. त्या पुलाखालूनच नागरिक नांदगावला येण्यासाठी कसाबसा पूल पार करीत आहे. त्याशिवाय नांदगावजवळील नाल्यावरील मोरीच गेल्या अनेक वर्षांपासून वाहून गेल्याने त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातूनच नागरिक रस्ता काढत आहे.
लक्ष्मीनगर ते मांडवड या रस्त्याची आगदी चाळण झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहे. संबंधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.