फेब्रुवारीपासून रेशनमधून मक्याची रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:02 AM2019-01-11T01:02:39+5:302019-01-11T01:02:58+5:30

गेल्या वर्षी बम्पर उत्पादन झालेला मका थेट रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या राज्य सरकारने यंदाही तोच कित्ता गिरविण्याचा निर्णय घेतला असून, आधारभूत किमतीत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेला सुमारे २२ हजार क्विंटल मका पुढच्या महिन्यापासून रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे.

Maize bread from ration since February | फेब्रुवारीपासून रेशनमधून मक्याची रोटी

फेब्रुवारीपासून रेशनमधून मक्याची रोटी

Next
ठळक मुद्देप्रत्येकी एक किलोचे वाटप : अगोदर दर्जाची तपासणी

नाशिक : गेल्या वर्षी बम्पर उत्पादन झालेला मका थेट रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या राज्य सरकारने यंदाही तोच कित्ता गिरविण्याचा निर्णय घेतला असून, आधारभूत किमतीत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेला सुमारे २२ हजार क्विंटल मका पुढच्या महिन्यापासून रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा अपुºया पावसामुळे मक्याच्या उत्पादनात घट झाली असली तरी, शासनाने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आधारभूत किमतीत यंदाही मक्याची खरेदी केली. जिल्ह्यातील दहा केंद्रावर डिसेंबर महिन्यात मका खरेदी करण्यात आला असून, सध्या त्याची साठवणूक शासकीय गुदामात केली जात आहे; परंतु तीन वर्षांपूर्वी खरेदी केलेला मका गुदामातच सडल्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शासनाने गेल्या वर्षापासून त्या त्या जिल्ह्यात खरेदी केलेल्या मक्याची त्यात जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षी जवळपास दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी होऊन तितका मका सलग सहा महिने पुरवठा खात्याच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारण्यात आला होता. जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, त्यांचे मुख्य अन्न भात व नागली आहे, अशा वेळी त्यांच्याकडून रेशनमधून मिळणाºया मक्याला विरोध करण्यात आला. परंतु सरकारने सक्ती केल्यामुळे अगदी शेवटी नागरिक नको नको म्हणत असतानाही त्यांना दरमहा मिळणाºया गव्हाऐवजी मक्याची रोटी खावी लागली होती. यंदाही आधारभूत किमतीत खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिका धारकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना पाच किलो, तर अन्न सुरक्षा कायद्यान्वये पात्र
ठरलेल्या प्रती व्यक्तीस एक किलो याप्रमाणे प्रत्येक शिधापत्रिका धारकास पाच किलोपर्यंत मका दिला जाणार आहे.
गुदामात साठवणुकीची काळजी घेण्याचे आदेश
शासनाने १५ जानेवारीपर्यंत आधारभूत किमतीत मका खरेदीला मुदतवाढ दिल्यामुळे तोपर्यंत खरेदी होणाºया मक्याचे प्रमाण लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यापासून रेशनमधून वाटप केले जाणार आहे. सदरचा मका खाण्यायोग्य आहे किंवा नाही याबाबत अगोदर भारतीय अन्न महामंडळ व गुणवत्ता नियंत्रक यांच्याकडून त्याची तपासणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचबरोबर खरेदी केलेल्या मक्याच्या साठवणूक गुदामात तो खराब होेऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचेही आदेश आहेत.

Web Title: Maize bread from ration since February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.