मका शेती हिरव्या शालूने नटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 09:57 PM2020-09-06T21:57:40+5:302020-09-07T00:31:32+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील मका पीक सध्या जोमात असल्यामुळे बळीराजांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झाले आहे. तालुक्यातील मका शेतीने जणू हिरवा शालू पांघरल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील मका पीक सध्या जोमात असल्यामुळे बळीराजांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झाले आहे. तालुक्यातील मका शेतीने जणू हिरवा शालू पांघरल्याचे चित्र दिसून येत आहे.
खरीप हंगामातील मका पीक दोन धोरणात्मक दृष्टिकोनातून घेतले जाते. एक जनावरांसाठी चारा व दुसरे पुढील हंगामासाठी नगदी भांडवल तयार करण्यासाठी. यंदा मका घेताना शेतकरीवर्गामध्ये द्विधाअवस्था होती. कारण पावसाचा लहरीपणा वेळोवेळी निर्माण होत होता. परंतु तालुका कृषी विभागाने शेतकरीवर्गासाठी योग्य वेळी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे नियोजन करून मका पिकाचे घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन व नियोजन यांची सांगड घालून मका लागवडीवर भर दिला.
मागील हंगामात मका पिकांवर अनेक संकटे निर्माण झाली होती. त्यात प्रामुख्याने लष्करी अळीने मका पिकाला हैराण केले होते. त्यामुळे जवळजवळ ४० ते ५० टक्के उत्पन्नाला मोठा फटका बसला होता. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यात शेतकऱ्यांना यशयंदा कृषी विभागाने योग्य नियोजन करून तालुक्यातील शेतकरीवर्गाचे मका क्षेत्र कसे वाढविता येईल
यावर भर दिला होता. खरिपातील मका जनावरांसाठी चारा रूपाने चांगला मानला जातो. भरपावसाळ्यातही मका येत असल्यामुळे तिच्यात चवदारपणा जास्त असतो व कणीस दाणेदार पद्धतीचे तयार होत असल्याने शेतकरीवर्गाला उत्पन्नवाढीसाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. यंदा मका पिकाने अगोदरचा उगवण क्षमतेचा कालखंड जर सोडला तर या पिकाने सर्वच रोगांवर मात केलेली आहे.
आजही या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत नाही.
खरीप हंगामात तालुक्यातील ७० टक्के शेतकºयांची मका पिकाला पसंती.
यंदा मका पिकावर कुठल्याही प्रकाराचा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही.
कोरोनाच्या काळातील झालेले नुकसान भरून निघण्याची अपेक्षा.
मागील वर्षीच्या तुलनेत मक्याच्या हेक्टरी सरासरी उत्पन्नात वाढ.शेतकरीवर्गाच्या मेहनतीमुळे मका पिकाला यंदा सुगीचे दिवस येणार हे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे. मका पिकाचे सरासरी उद्दिष्टे यंदा पूर्ण होईल. सध्या तालुक्यात दिसत असल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
- पंकज शिवले,
मका उत्पादक, परमोरी