मका बाजारभावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:26 PM2020-02-14T18:26:25+5:302020-02-14T18:27:08+5:30

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांचे बाजारभाव झपाट्याने कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यापाठोपाठ मका पिकाचे दरही एक हजार ते बाराशे रु पयांनी कमी झाल्याने शेतकरीवर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Maize markets fall | मका बाजारभावात घसरण

पाटोदा परिसरात काढणीअभावी खळ्यात पडलेला मका

Next
ठळक मुद्देभाव निम्म्याने घटले : दरवाढण्याची आशा फोल; शेतकरी हवालदिल

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांचे बाजारभाव झपाट्याने कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यापाठोपाठ मका पिकाचे दरही एक हजार ते बाराशे रु पयांनी कमी झाल्याने शेतकरीवर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने उत्पादनात पन्नास ते साठ टक्क्यापेक्षा जास्त घट आल्याने शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर ठेवलेला मका सध्या मातीमोल भावात विकावा लागत असून, शेतकºयांनी साठवून ठेवलेल्या या पिवळ्या सोन्याची तेजी दिवसेंदिवस कमी होत आहे.
सध्या उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पटीने शेतकºयांना तोटा सहन करावा लागत असून, हातात आहे ते उत्पन्न विकण्यासाठी त्याची धावपळ असल्याचे चित्र सध्या येवला तालुक्यात पहावयास मिळत आहे. अडीच हजारावर पोहोचलेले मक्याचे दर गेल्या काही दिवसांपासून बाराशे, तेराशे, चौदाशे रु पये क्विंटल दराच्या आतच असून, पुढील काळात दर अजून कमी होतील, अशी भीती व्यापारीवर्ग शेतकºयांना दाखवून त्यांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याने शेतकरीवर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.
यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात उन्हाळी मक्याची लागवड केली आहे. येत्या काही दिवसात उन्हाळ मकाही काढणीस येणार असल्याने दर वाढण्याची शक्यता नसल्याने शेतकºयांनी आहे तो मका मिळेल त्या भावात विक्र ी करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.
कर्ज कसे फेडायचे?
शेतकºयांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांना मातीमोल दर मिळत असल्याने केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक शेतकºयांनी आपल्या कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बँका वा पतसंस्थांकडे गहाण ठेवून भांडवल घेतले आहे; मात्र शेतीसाठी भांडवल म्हणून उचललेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Maize markets fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.