अधिकाऱ्यांकडून मक्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:50 AM2019-06-20T00:50:21+5:302019-06-20T00:50:44+5:30

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीची लागण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन मका पिकाची पाहणी केली.

 Maize survey by the authorities | अधिकाऱ्यांकडून मक्याची पाहणी

अधिकाऱ्यांकडून मक्याची पाहणी

Next

नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीची लागण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन मका पिकाची पाहणी केली.
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील दारणा, वालदेवी व गोदावरी नदी भागातील वंजारवाडी, लहवित, भगूर, लोहशिंगवे, नाणेगाव, राहुरी, दोनवाडे, शिंदे, पळसे, शेवगेदारणा, संसरी, बेलतगव्हाण, चेहेडी, सामनगाव, कोटमगाव, गंगापाडळी, लाखलगाव, जाखोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. गेल्या महिना-दीड महिन्यापूर्वी लावलेल्या मका पिकावर अमेरिकन लष्कर अळी या कीडची लागण झाल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे सविस्तर वृत्त बुधवारी (दि.१९) लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते.
सदर वृत्ताची दखल घेत तालुका कृषी अधिकारी श्याम जोशी, तंत्र अधिकारी विश्वास बर्वे, कृषी पर्यवेक्षक एस. पी. चौधरी यांनी गुरुवारी सकाळपासून वंजारवाडी, लहवित, पळसे, शेवगेदारणा, जाखोरी आदी गावांमध्ये भेट देऊन मका पिकाची पाहणी केली. मका पिकाला लागलेली अमेरिकन लष्कर अळी कीडबाबत करावयाच्या उपाययोजना, औषध फवारणी, निगा व काळजी याबाबत कृषी अधिकाºयांनी मार्गदर्शन केले. अमेरिकन लष्कर अळी या किडचे मका व मधुमका (स्वीट कॉर्न) हे आवडते पीक असून, ही कीड रातोरात वाºयाच्या वेगाने पसरत असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले.
अमेरिकन लष्कर आळी ही कीड अमेरिकेतून दक्षिण आफ्रिकेमध्ये आली होती. २०१६-१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ही कीड कर्नाटकात आली. तेथून ही कीड गेल्यावर्षी कोल्हापुरात आली. यंदाच्या वर्षी उत्तर व पश्चिम महाराष्टÑात या अमेरिकेन लष्कर आळी किडीची लागण झाली आहे.  - श्याम जोशी, तालुका कृषी अधिकारी

Web Title:  Maize survey by the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.