१८५० रुपये दराने होणार मका खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:31 PM2020-11-20T21:31:05+5:302020-11-21T00:48:00+5:30

सटाणा : तालुक्यातील डांगसौंदाणे येथे आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२०) आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.

Maize will be procured at the rate of Rs. 1850 | १८५० रुपये दराने होणार मका खरेदी

१८५० रुपये दराने होणार मका खरेदी

Next

सटाणा : तालुक्यातील डांगसौंदाणे येथे आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२०) आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.  नाशिक येथील प्रादेशिक महामंडळाने मका आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणाऱ्या या केंद्रावर महामंडळाच्या निकषात बसणारा कोरडा (सुकलेला) मका हमीभाव प्रतिक्विंटल रुपये १८५० या दराने खरेदी करण्यात येणार असून, हेक्टरी ३५ क्विंटल मका शेतकऱ्यांचा घेतला जाणार आहे. यासाठी नोंदणी आवश्यक असून, याबाबत केंद्रावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.  डांगसौंदाणे येथील सप्तशृंगी महाविद्यालयाच्या आवारात आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते या खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी मोरे, कळवणच्या उपप्रादेशिक अधिकारी सुवर्णा मोरे, ग्रेडर खैरनार, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, डॉ. सुधीर सोनवणे, भाजप तालुका उपाध्यक्ष अनंत दीक्षित, दिगंबर भदाणे, कैलास कोल्हे, सोपान सोनवणे, माजी सरपंच मोठाभाऊ सोनवणे, मनोहर सोनवणे, साहेबराव बोरसे, पंढाआप्पा सोनवणे, हिरालाल बाविस्कर, मनोहर सोनवणे, नंदू बैरागी, डांगसौंदाणे उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, सखाराम खैरनार, भिका कुंभार, गणेश सोनवणे, संतोष परदेशी, प्रभाकर सोनवणे, सुमेध चंद्रात्रे, रवींद्र सोनवणे, आबा गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते.
----------------
डांगसौंदाणे येथील आदिवासी विकास महामंडळाचे गुदाम मोडकळीस आले आहे. त्याची आमदार बोरसे यांनी पाहणी करून लवकरच महामंडळामार्फत धान्य साठवणुकीसाठी अद्यावत गुदाम उभारण्यात येईल तसेच बुंधाटे येथे पश्चिम आदिवासी बांधवांसाठी लवकरच सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Maize will be procured at the rate of Rs. 1850

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक