बारशिंगवे परीसरात येथे भात पिकाचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 06:27 PM2020-10-21T18:27:59+5:302020-10-21T18:28:34+5:30
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या भात पीक नुकसानीचे प्रत्यक्षात पाहणी करून शासकीय पातळीवर दखल घेण्यासंदर्भात कृषी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी सूचना करून शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी घेऊन अडचणी समजून घेतल्या
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या भात पीक नुकसानीचे प्रत्यक्षात पाहणी करून शासकीय पातळीवर दखल घेण्यासंदर्भात कृषी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी सूचना करून शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी घेऊन अडचणी समजून घेतल्या असून बारशिंगवे गावचे सरपंच अशोक बोराडे, उपसरपंच पोपट लहामगे, माजी सरपंच गुलाब भले, शिवाजी बोराडे, सोनोशीचे सरपंच दिलीप पोटकुले, दत्तू पेढेकर, शंकर चोथवे, विक्रम भांगे, हरी कदम तसेच इतर शेतकरी तसेच ग्रामसेवक व कृषी सहायक उपस्थित होते. बारशिंगवेप्रमाणे तालुक्यातील जवळपास सर्वच गावांची हीच परिस्थिती आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाला निवेदनाद्वारे विनंती केली आहे.