सावानात ग्रंथालय भूषण पॅनलला बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 01:52 AM2022-05-11T01:52:12+5:302022-05-11T01:52:49+5:30

नाशिक : सावानाच्या कार्यकारीणी सदस्य पदासाठीच्या निवडणुकीत अधिकच चुरस रंगली. त्यामुळे १५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत प्रा. दिलीप फडके प्रणीत ग्रंथालय भूषण पॅनलचे १२ तर श्रीकांत बेणी - वसंत खैरनार यांच्या नेतृत्वाखालीत ग्रंथ मित्र पॅनलचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे २०२२ ते २०२७ या कालावधीत सावानावर ग्रंथालय भूषण पॅनलच्या पुस्तकांचे वर्चस्व राहणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

Majority to Library Bhushan panel in Savannah | सावानात ग्रंथालय भूषण पॅनलला बहुमत

सावानात ग्रंथालय भूषण पॅनलला बहुमत

Next
 

नाशिक : सावानाच्या कार्यकारीणी सदस्य पदासाठीच्या निवडणुकीत अधिकच चुरस रंगली. त्यामुळे १५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत प्रा. दिलीप फडके प्रणीत ग्रंथालय भूषण पॅनलचे १२ तर श्रीकांत बेणी - वसंत खैरनार यांच्या नेतृत्वाखालीत ग्रंथ मित्र पॅनलचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे २०२२ ते २०२७ या कालावधीत सावानावर ग्रंथालय भूषण पॅनलच्या पुस्तकांचे वर्चस्व राहणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

सावानासाठीच्या १५ जणांच्या कार्यकारीणीच्या मतमोजणीस मंगळवारी (दि. १०) प्रारंभ झाला. मतमोजणीच्या प्रारंभी सर्व मते एकत्रित करुन त्यातील बाद मते वेगळी काढण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर बाद काढण्यात आलेल्या मतपत्रिकांना दोन्ही पॅनल तसेच अपक्ष उमेदवारांना दाखवून खातरजमा करण्यात आली. एकूण ३९०५ मतदानापैकी तब्बल ३४२ मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने मतदान झाल्याने बाद ठरविण्यात आल्या.त्यामुळे ३५६३ मतेच वैध ठरली. तर अंतिम निकालात ग्रंथालय भूषणच्या उमेदवारांमधून संजय करंजकर, प्रेरणा बेळे, जयेश बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, ॲड. अभिजीत बगदे, सुरेश गायधनी, देवदत्त जोशी, धर्माजी बोडके,  गिरीश नातू, सोमनाथ मुठाळ, मंगेश मालपाठक, उदयकुमार मुंगी यांचा तर ग्रंथ मित्र पॅनलचे श्रीकांत बेणी , प्रशांत जुन्नरे, आणि ॲड. भानुदास शौचे यांचा समावेश आहे.तर अपक्ष उमेदवारांमध्ये सर्वाधिक ५९५ मते मोहन उपासनी यांना मिळाली. रात्री उशीरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर विजेत्या उमेदवारांच्या समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. यापूर्वी सोमवारच्या निकालात अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके तर उपाध्यक्ष पदी वैद्य विक्रांत जाधव आणि प्रा. सुनील कुटे निवडून आले होते. 

इन्फो 

सुमारे एक दशांश मते बाद 

मंगळवारी कार्यकारीणी सदस्य पदाच्या मतपत्रिकांची तपासणी केली असता ३९०५ मतपत्रिकांपैकी तब्बल ३४२ मतपत्रिका विविध कारणांनी बाद ठरविण्यात आल्या. एकूण मतांच्या तुलनेत हे प्रमाण ९ टक्क्यांवर असल्याने तांत्रिक चुकींमुळे एकूण मतदानाच्या सुमारे एक दशांश मतपत्रिका बाद झाल्या आहेत. त्यामुळे अटीतटीच्या या लढतीत मतपत्रिका बाद झाल्या नसत्या किंवा अत्यल्प झाल्या असत्या तरी यापेक्षा अजून वेगळे चित्र दिसले असते. 

इन्फो

बाद मतपत्रिकांमध्ये मुख्य कारण १४ किंवा १६ मते 

मंगळवारी झालेल्या मतमोजणीत मतपत्रिका बाद होण्याच्या मुख्य कारणांमध्ये मतपत्रिकांवर १४ किंवा १६ मते दिलेली असणे हे मुख्य कारण ठरले आहे. काहींनी तर ११ शिक्के मारुनच थांबून घेतले. तर काही मतदारांनी १७ हून अधिक शिक्के मारुन ठेवल्याने त्यांच्याही मतपत्रिका बाद झाल्या आहेत. 

इन्फो 

काही ‘अंगठेबाज’ मतदार 

मतपत्रिकांवर केवळ १५ ठिकाणी मतदानाचा ठसा उमटवायचा असताना त्या मतपत्रिकांमध्ये ३ मतपत्रिकांवर मतदारांनी अंगठे टेकवून मतदान केले होते. तर ३ मतपत्रिका कुणालाही मतदान न करता पूर्ण कोऱ्या टाकण्यात आल्या होत्या. तर काही मतपत्रिकांवर एकेक उमेदवारालाच मतदान करुन त्या मतपेटीत टाकण्यात आल्या होत्या. 

इन्फो 

आय लव्ह यु अभिजीत !

कार्यकारीणीच्या मतपत्रिकांमध्ये बाद करण्यात आलेल्या २ मतपत्रिकांचे रुप पाहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनादेखील हसू आवरेनासे झाले. त्यातील एका पत्रिकेवर अभिजीत बगदे यांच्या नावापुढे शिक्का मारण्याऐवजी ‘आय लव्ह यु अभिजीत’ असे लिहून त्या मतपेटीत टाकण्यात आल्या होत्या. असे खोटे प्रेम दाखवून मत बाद करणारा कुणी ‘आप’ ल्यातलाच तर नाही ना, अशी चर्चादेखील त्यामुळे मतमोजणी केंद्रावर रंगली होती.----------------

इन्फो 

आरडाओरड, ढोल पिटू नका 

निवडणूक निर्णय अधिकारी शंकर सोनवणे, सहायक निवडणूक अधिकारी योगिनी जोशी आणि निवडणूक हाताळणाऱ्या संपूर्ण टीमने अत्यंत चांगले आणि शांतचित्ताने काम केल्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो, असे नूतन अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी सांगितले. तसेच निकाल रात्री लागला असल्याने सावानाच्या वास्तूत किंवा बाहेरही फटाके, आरडाओरड किंवा ढोल बडवून कुणीही जल्लोष करु नये. पोलीस यंत्रणेनेदेखील अत्यंत चांगले सहाकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानत असल्याचे प्रा.फडके यांनी सांगितले. 

 

 

--------

उमेदवार निहाय सर्वाधिक मिळालेली एकूण मते : 

१) संजय करंजकर - १९८६

२) प्रेरणा धनंजय बेळे - १९४६

३) जयेश बर्वे - १८६३

४) जयप्रकाश जातेगावकर - १८२६

५) ॲड. अभिजीत बगदे - १७९०

६) सुरेश गायधनी - १७२१

७ ) देवदत्त जोशी - १७२१

८) डॉ. धर्माजी बोडके -१६६४

९) गिरीश नातू - १६२३

१०) सोमनाथ मुठाळ - १५९४

११) मंगेश मालपाठक - १५६३

१२) प्रशांत जुन्नरे - १५६१

१३ ) उदयकुमार मुंगी - १५४६

१४) श्रीकांत बेणी - १५१५

१५ ) ॲड. भानुदास शौचे - १५०३ 

 

 

 

ReplyForward

 

Web Title: Majority to Library Bhushan panel in Savannah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.