विविध उपक्रमांनी मकरसंक्रांत साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 10:50 PM2020-01-16T22:50:12+5:302020-01-17T01:20:26+5:30
भारतीय संविधनाच्या प्रास्ताविकेचे जाहीर वाचन, संगीत रजनी, कलावंतांचा सन्मान, महिलांना पुस्तके वाटप, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांनी राष्टÑ सेवा दल व साधना वाचनालय यांच्या वतीने मकरसंक्रांतीचा स्नेहमेळावा झाला.
संगमेश्वर : भारतीय संविधनाच्या प्रास्ताविकेचे जाहीर वाचन, संगीत रजनी, कलावंतांचा सन्मान, महिलांना पुस्तके वाटप, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांनी राष्टÑ सेवा दल व साधना वाचनालय यांच्या वतीने मकरसंक्रांतीचा स्नेहमेळावा झाला.
संगमेश्वरातील साधना वाचनालयाच्या सभागृहात या निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगाजमना संस्कृतीचे प्रतीक जपत मुस्लीम बांधवांसमवेत तिळगूळ वाटप करीत मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. मौलाना रमजान नदवी यांनी सण उत्सवाच्या माध्यमातून भारताची राष्टÑीय एकात्मता जपण्याचा सेवा दलाच्या उपक्रमाचे आपल्या भाषणातून कौतुक केले. दिनेश गिते, श्रीराम सोनवणे, जितेंद्र वडगे, इस्माईल भाई, आसीफ भाई, सुनील वडगे यांच्या बहारदार गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. या सर्व कलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आली. महिलांना संक्रांतीचे वाण म्हणून संस्कारक्षम पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सतीश कलंत्री, विशाल पाटील, अशोक सोनगिरे, सुधाकर बागुल, किशोर मोरे, जितेंद्र देसले, दीपक अहिरे, एल.पी. भालेराव, मुज्जफर शेख, प्रभाकर अहिरे, सुरेंद्र टिपरे, प्रकाश वडगे, सुधीर साळुंके, राजीव वडगे, कल्पना पाटील, प्रणाली पगारे, योगेश देशावरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचलन अशोक फराटे यांनी केले. आभार अशोक पठाडे यांनी मानले.
या कार्यक्रमात राष्टÑसेवा दलाच्या राज्यभर राबविण्यात येत असलेल्या संविधान जागर अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. संविधानाच्या प्रास्ताविकेचे जाहीर वाचन स्वाती वाणी यांनी केले. या अभियानांतर्गत येत्या २६ जानेवारीपर्यंत ठिकठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे जाहीर वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे.