देशमानेत ‘करा-केळी’ बनविण्यासाठी लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 06:57 PM2019-03-11T18:57:08+5:302019-03-11T18:58:57+5:30

देशमाने : महत्वाचा सण असलेल्या अक्षय तृतीया या सणासाठी पूजनीय करा-केळी येथील कुंभारवाड्यात सध्या या करा-केळी बनवण्याच्या कामात कुंभार समाज व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. करा-केळी सोबतच उन्हाळी माठ बनवण्याचे काम देखील वेगात सुरू आहे. येथील करा-केळी व उन्हाळी माठास बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

To make 'Kar banal' in Deshmana | देशमानेत ‘करा-केळी’ बनविण्यासाठी लगबग सुरू

देशमानेत कुंभारवाड्यात करा-केळी बनविण्यात व्यस्त कुटूंब.

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाभरातून या वस्तुंना मोठी मागणी असल्याने दोन महिने अगोदरच तयारी करावी लागते.

देशमाने : महत्वाचा सण असलेल्या अक्षय तृतीया या सणासाठी पूजनीय करा-केळी येथील कुंभारवाड्यात सध्या या करा-केळी बनवण्याच्या कामात कुंभार समाज व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. करा-केळी सोबतच उन्हाळी माठ बनवण्याचे काम देखील वेगात सुरू आहे. येथील करा-केळी व उन्हाळी माठास बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
वैशाख महिन्यात सूर्याची प्रखरता तीव्रतेने वाढते. त्याचा परिणाम सभोवतालच्या सृष्टीवर देखील पडलेला दिसतो. अशा वैशाख वणव्यात अक्षय तृतीया हा सण येत असल्याने पितरांची करा-केळी हे प्रतीक मानून पूजा केली जाते. साडेतीन मुहूर्तातील एक हा सण असल्याने हिंदूंच्या प्रत्येक घरात तो परंपरागत साजरा केला जातो. तृषात पितरांना थंड पाणी मिळावे, अशी श्रद्धा असल्याने या सणासाठी करा-केळीस मोठी मागणी असते.
जिल्हाभरातून या वस्तुंना मोठी मागणी असल्याने दोन महिने अगोदरच तयारी करावी लागते. या हंगामी व्यवसायातून चांगली कमाई होते असे या व्यवसायीकांनी सांगितले.
करा-केळी व उन्हाळी माठ बनविण्यासाठी लागणारी माती, भाजणीसाठी लागणारे साहित्य दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे, पूर्वी मुबलक पूर पाण्याने नदीपात्रात माती सहज उपलब्ध होत, आता माती मिळविण्यास अनेक अडचणी येत असल्याने दरवर्षी पेक्षा करा-केळीचे दर २० ते २५ रुपये तर उन्हाळी माठ ५० ते १०० रुपयांनी महागणार आहे.
- बाळासाहेब गोरे,
देशमाने.
 

Web Title: To make 'Kar banal' in Deshmana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक