मालगव्हाणला आदर्श गाव करा
By admin | Published: March 10, 2017 12:42 AM2017-03-10T00:42:47+5:302017-03-10T00:42:57+5:30
सुरगाणा : गावकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वत:ला झोकून देऊन काम केले तरच या गावची आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मालगव्हाण येथे केले.
सुरगाणा : येथून जवळच असलेली ग्रुप ग्रामपंचायत मालगव्हाण मध्ये सांसद आदर्श ग्रामयोजना राबवून हे गाव आदर्श करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन हे काम आपलेच आहे असे समजून स्वत:ला झोकून देऊन काम केले तरच या गावची आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मालगव्हाण येथे केले.
या गावात स्वातंत्र्यापूर्वीपासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. म्हणून या गावाची निवड करण्यात आली आहे. सदर योजना राबविण्यासाठी विकासाचा आराखडा आखण्यात येणार असल्याचे यावेळी खासदार चव्हाण यांनी सांगितले. मान्यवरांचे पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, तहसीलदार दादासाहेब गिते, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण, एन. डी. गावित, आदर्श सांसद गाव अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक चौधरी, प्रकाश फालकर, विस्तार अधिकारी शिक्षण संजय कुसाळकर, वनविभागाचे अधिकारी नवले, सातपुते, गायकवाड, कार्यकारी अभियंता ठाकरे, शेळके, मोरे, बागुल, शेकडे , नगराध्यक्ष रंजना लहरे, सुरेश गवळी, विजय कानडे, सचिन आहेर, सचिन महाले आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच कमळाबाई चौधरी, उपसरपंच माधव चव्हाण, लक्ष्मण जाधव, होनाजी भोये, सुरेश चौधरी, विनायक चव्हाण, राम चौधरी, भावडू चौधरी, नारायण देशमुख, लक्ष्मण ठाकरे, विठ्ठल चव्हाण, मनोहर चव्हाण, वसंत चव्हाण, नारायण बाबा, यशवंत चव्हाण, मनीषा चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले.