मॉडेल पोलीस अधिकारी बनून जनतेची सेवा करा : दत्ता पडसलगीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 04:18 PM2019-01-08T16:18:27+5:302019-01-08T16:31:57+5:30

नाशिक : दहशतवादाचा सामना करण्याबरोबरच पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदारास चांगली वागणूक द्या, सामाजिक बांधिलकी, स्वच्छ कारभार याबरोबरच कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून मॉडेल पोलीस अधिकारी बनून जनतेची सेवा करा असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर मंगळवारी (दि़ ८) झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११६ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी पुणे जिल्ह्यातील चैताली गपाट यांचा स्वोर्ड आॅफ आॅनर (मानाची तलवार), अमितकुमार करपे (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी) यांच्यासह पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थींचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला़

Make the model police officer and serve the people: Datta pasalgikar | मॉडेल पोलीस अधिकारी बनून जनतेची सेवा करा : दत्ता पडसलगीकर

मॉडेल पोलीस अधिकारी बनून जनतेची सेवा करा : दत्ता पडसलगीकर

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र पोलीस अकादमी दीक्षान्त समारंभ : पोलीस उपनिरीक्षक ११६ वी तुकडीपुण्याची चैताली गपाटे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ; उस्मानाबादचे करपे द्वितीय

नाशिक : दहशतवादाचा सामना करण्याबरोबरच पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदारास चांगली वागणूक द्या, सामाजिक बांधिलकी, स्वच्छ कारभार याबरोबरच कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून मॉडेल पोलीस अधिकारी बनून जनतेची सेवा करा असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर मंगळवारी (दि़ ८) झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११६ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी पुणे जिल्ह्यातील चैताली गपाट यांचा स्वोर्ड आॅफ आॅनर (मानाची तलवार), अमितकुमार करपे (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी) यांच्यासह पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थींचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला़

पडसलगीकर पुढे म्हणाले की, पोलीस उपनिरीक्षक हे महत्वाचे पद असून बदली कोठेही झाली तरी या ठिकाणी मिळालेले प्रशिक्षण कायमच तुमच्यासोबत असेल़ या प्रशिक्षणाचा उपयोग भविष्यातील आंदोलनांची हाताळणी तसेच गुन्ह्यांच्या तपासासाठी उपयोगात येणार आहे़ या तुकडीत खातेअंतर्गत परीक्षा पास झालेले १४५ पुरूष व ७ महिला तसेच सागरी सुरक्षा तटरक्षक दलातील २३ असे १७५ अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर लांबीच्या सागरी सुरक्षा महत्वाची असून किनारपट्टीवरील शहरांच्या सुरक्षिततेसाठी लक्ष ठेवणे, समुद्रमागार्ने येणारे धोके निकामी करण्याचे काम तुम्हाला करावे लागणार आहे़ पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर घेतलेली शपथ कायम स्मरणात ठेवा असे पडसलगीकर यांनी सांगितले़

यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी सादर शानदार संचलन केले़ प्रारंभी अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांनी प्रशिक्षणार्थींना शपथ दिली. तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमी ही देशपातळीवरील अग्रगण्य संस्था असल्याचे सांगितले़ यावेळी व्यासपीठावर अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय सक्सेना, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते़ सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.


पोलीस खात्यातील उच्च पदाचे स्वप्न

मध्यमवर्गीय कुटुंबातील असून २०१० मध्ये पुणे येथे पोलीस शिपाई म्हणून भरती झाले़ २०१६ मध्ये पोलीस खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले़ पोलीस खात्यात येण्यापुर्वी १२ वी सायन्स झालेले होते़ त्यानंतर बीएस्सी, बीए, एलएल़बी व आता एलएलएम करते आहे़ ९ एप्रिल २०१८ रोजी प्रशिक्षण सुरू झाले असून ९ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महिला कुठेही कमी नाहीत हे सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार मिळवून दाखवून दिले आहे़ घरी एकत्रित कुटुंब असून शिक्षण तसेच पोलीस अधिकारी होण्यासाठी पतीने खूप प्रोत्साहन दिले़
- चैताली गपाट, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी़ 


तिसरी पिढी पोलीस खात्यात


उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूरजवळील नळदुर्ग हे आमचे मूळ गाव असून आमची ही तिसरी पोलीस दलात आहे़ आजोबा पोलीस हवालदार होते़ वडील सहायक पोलीस उपनिरीक्षक तर मी पोलीस उपनिरीक्षक झालो़ २००८ मध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झालो़ २०१६ मध्ये खातेअंतर्गत परीक्षा पास झाल्यानंतर ९ एप्रिलपासून २०१८ पासून प्रशिक्षण सुरू झाले़ पोलीस उपनिरीक्षकपदाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता जनतेची सेवा करावयाची आहे़
- अमितकुमार करपे, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी-द्वितीय़ 


‘अ‍ॅम्बीस’ प्रशिक्षण दिलेली पहिलीच तुकडी
महाराष्ट्र पोलीस अकादमीतर्फे अ‍ॅम्बीस अर्थात ठसेतज्ज्ञ प्रणालीचे शिक्षण देण्यात आलेली ही पहिलीच तुकडी आहे़ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या हात व पायाचे ठसे स्कॅन केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती कशी मिळवायची याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आलेली ही पहिलीच तुकडी आहे़ या प्रशिक्षणाचा फायदा या अधिकाºयांना प्रत्यक्ष कामकाजाच्या ठिकाणी होणार आहे़


निमंत्रितांची पाठ
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षान्त सोहळ्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी बहारदार संचलन केले़ मात्र, या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित असलेले पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना निमंत्रण देऊनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने विशेष निमंत्रितांचा मंडप रिकामा होता़ या कार्यक्रमास मंत्रीमहोदय उपस्थित नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे टाळल्याची चर्चा आहे़


पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थी


* चैताली गपाट (पुणे) - स्वॉर्ड आॅफ आॅनर, स्व़ यशवंतराव चव्हाण सुवर्णकप सर्वोत्कृष्ट सर्वांगीण प्रशिक्षणार्थी, अहिल्याबाई होळकर ट्रॉफी सर्वोत्कृष्ट सर्वांगीण महिला प्रशिक्षणार्थी,सर्वोत्कृ ष्ट प्रशिक्षणार्थी अभ्यास (सिल्व्हर बॅटन), सावित्रीबाई फुले ट्रॉफी सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी आंतरवर्ग प्रशिक्षण, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी आधुनिक तंत्रज्ञान आणि बेकायदेशीर जमाव हाताळणे, डॉ़ बी़आऱ आंबेडकर ट्रॉफी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी कायदा
* अमितकुमार करपे (उस्मानाबाद) - सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी द्वितीय
* अजयकुमार राठोड - सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी फिजिकल ट्रेनिंग, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी परेड, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी उत्कृष्ट गणवेश
* विनोद शेंडकर - सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी गुन्हेगारी शास्त्र व पिनालॉजी
* सचिन सानप - एऩएम़ कामटे ट्रॉफी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी रिवॉल्व्हर फायरिंग
* विजय राऊत - सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी खेळाडू
* योगेश कातुरे - एस़जी़ इथापे पारितोषिक सर्वोत्कृष्ट वागणूक / वर्तणूक
* रामजीलाल दूर्जनलाल पटले : सागरी पोलीस उपनिरीक्षक - आंतरवर्ग-बाह्यवर्ग या विषयामध्ये सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी
* राजश्री पाटील - सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी कल्चरल अ‍ॅक्टिविटी
 

Web Title: Make the model police officer and serve the people: Datta pasalgikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.