लोकसहभागातून विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:28+5:302021-02-15T04:14:28+5:30

नाशिकरोड : साहित्यिकांबरोबरच, कलाकार, शाहीर आदी सर्वांना आमंत्रित करून लोकसहभागातून विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन विद्रोही सांस्कृतिक ...

Make the Rebel Literature Convention a success through public participation | लोकसहभागातून विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करा

लोकसहभागातून विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करा

googlenewsNext

नाशिकरोड : साहित्यिकांबरोबरच, कलाकार, शाहीर आदी सर्वांना आमंत्रित करून लोकसहभागातून विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी जेलरोड परिसरातील संयोजन समितीच्या बैठकीत केले आहे. संमेलनासाठी आर्थिक चणचण असली तरी जनतेतून पैसा उभा करुन संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारचे मतभेद, गटतट, मान-अपमान बाजूला ठेवून संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी चळवळीतील कार्यकर्त्यांना केले.

नाशिक शहरात १५ वे विद्रोही साहित्य संमेलन होत असून त्याच्या नियोजनासाठी नाशिक रोडच्या जेल रोड परिसरात झालेल्या बैठकीत प्रा. परदेशी यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘मिलते रहेंगे, मिलके रहेंगे’ चा नारा देत संमेलनात सक्रिय सहभागाचे आवाहन केले. भारतीय संविधानाच्या मूल्यांना नख लावण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्या विरोधातच विद्रोही साहित्य संमेलन नाशिकला होत असल्याचे त्यांनी सांगितले. मिलिंद देहाडे, यशवंत मकरंद यांनी विद्रोहाची दखल इतिहास नक्कीच घेईल, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी किशोर ढमाले, विनायक पठारे, संजय उन्हवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाशिकचे शशीकांत उन्हवणे यांची निवड करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक गणेश उन्हवणे यांनी केले. यावेळी विद्रोही चळवळीच्या राज्य कार्यकारिणीतील जितेंद्र महाजन (जळगाव), प्रशांत सोनुने (बुलढाणा), किशोर ढमाले, यशवंत मकरंद (परभणी), डॉ. सुरेश शेळके (हिंगोली), सुभाष काकुस्ते (धुळे), ए. जे. गावीत (नंदुरबार), अर्जुन बागूल, यशवंत बागूल (मनमाड), दत्ता वायचळे (सिन्नर), नाशिकचे विनायक पठारे, रंगनाथ डेंगळे, संजय उन्हवणे, सतीश केदारे, एल. जे. गावित, हनीफभाई सौदागर, साराभाई वेळुंजकर आदी उपस्थित होते.

===Photopath===

140221\14nsk_27_14022021_13.jpg

===Caption===

विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीच्या बैठकीत बोलताना चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी

Web Title: Make the Rebel Literature Convention a success through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.