मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 05:47 PM2019-03-03T17:47:49+5:302019-03-03T17:48:28+5:30
सिन्नर नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या स्वनिधीतून साकारलेला मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार आमदार राजाभाऊ वाजे यांनी काढले.
सिन्नर : नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या स्वनिधीतून साकारलेला मैला व्यवस्थापनाचा प्रकल्प देशासाठी पथदर्शी आणि दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार आमदार राजाभाऊ वाजे यांनी काढले.
सुमारे १ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीतून वर्षाभरात उभारलेल्या मैला व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन आमदार राजाभाऊ वाजे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार वाजे बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, राजेश गडाख, अहमदाबाद येथक्षल सीईपीटी विद्यापीठाचे दिनेश मेहता, मीरा मेहता, असीम मन्सुरी, उत्कर्षा कवडी, मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांच्यासह नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.
शहर हगणदारीमुक्त झाल्यानंतर मैल्याची विल्हेवाट लावणे आवश्यक होते. त्यासाठी सदर प्रकल्प उभारुन त्यातून बाहेर पडणाºया पाण्यातून शहरातील झाडांना पाणी द्यावे व हरित सिन्नरच्या दृष्टीने वाटचाल करावी अशी सूचना आमदार वाजे यांनी केली. या प्रकल्पामुळे नगरपरिषदेला मिळालेल्या पुरस्काराची माहिती वाजे यांनी दिली. नगराध्यक्ष किरण डगळे यांनी या देशातील पहिल्या प्रकल्पाची जगभरात नोंद झाल्याचे सांगितले. प्रकल्प पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातून अभ्यासक येतील असे ते म्हणाले. मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास यांनी स्वच्छ भारत अभियातांर्गत केलेल्या कामांचा आढावा घेत प्रकल्पाबाबत माहिती दिली. यावेळी दिनेश मेहता, मीरा मेहता, असीम मन्सुरी, उत्कर्षा कवडी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक सोमनाथ पावसे, श्रीकांत जाधव, प्रमोद चोथवे, विजय जाधव, निलिमा गाडे, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, सुजाता भगत, रुपेश मुठे, संतोष शिंदे, शीतल कानडी, धुव्र भावसार यांच्यासह नगरसेवक, नागरिक व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले.