दाभाडीत आरोग्य विभागातर्फे हिवताप जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:04 PM2020-06-17T22:04:51+5:302020-06-18T00:27:06+5:30
दाभाडी : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात आरोग्य विभाग कार्य करीत असताना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या इतर समस्यांपासूनही नागरिकांचे संरक्षण व्हावे व प्रत्येक कुटुंबाला हिवतापाची माहिती व्हावी यासाठी हिवताप जनजागृती मोहीम दाभाडीत राबविण्यात आली.
दाभाडी : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात आरोग्य विभाग कार्य करीत असताना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या इतर समस्यांपासूनही नागरिकांचे संरक्षण व्हावे व प्रत्येक कुटुंबाला हिवतापाची माहिती व्हावी यासाठी हिवताप जनजागृती मोहीम दाभाडीत राबविण्यात आली. यासाठी विविध फलक व बॅनरच्या माध्यमातून आणि घोषवाक्यांद्वारे जागृतीपर संदेश देण्यात आला. यावेळी दाभाडी उपकेंद्राचे डॉ. प्रसाद बोरसे, आरोग्य सहायक डी. झेड. निकम, आरोग्य सेवक विनायक अहिरे, आरोग्यसेविका ए. पी. वानखेडे, आशा सेविका नयना शिवदे उपस्थित होते.